मिरजेत गोवा बनावटीचा सव्वा लाखाचा दारू साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST2021-05-30T04:22:45+5:302021-05-30T04:22:45+5:30
मिरज : मिरजेत शहर पोलिसांनी मिरज-बेडग रस्त्यावर चेक पोस्टवर तपासणी करताना मोटारीतून आणलेली गोवा बनावटीची दारू व ...

मिरजेत गोवा बनावटीचा सव्वा लाखाचा दारू साठा जप्त
मिरज : मिरजेत शहर पोलिसांनी मिरज-बेडग रस्त्यावर चेक पोस्टवर तपासणी करताना मोटारीतून आणलेली गोवा बनावटीची दारू व मोटार असा एक लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी अजित मुर्ग्याप्पा कट्टीकर, शांतीनाथ सुरेश चौगुले, प्रमोद संभाजी हंडीफोड, रा. लक्ष्मीनगर मालगाव या तिघांना अटक करण्यात आली.
अटक केलेल्या तिघांकडून यांच्याकडून गोवा बनावटीची ३५ हजार ५०४ रुपयांची दारू, एमएच०४-डीआर-१२६५ या क्रमांकाची मोटार व तीन मोबाइल असा एकूण एक लाख ३४ हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सध्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यात दारू विक्री बंद असताना गोवा बनावटीच्या दारूची तस्करी मोठ्या सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी अंकलित बारा लाखांची दारू राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने जप्त केली होती. जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र आहे.