तब्येत सांभाळा, पाऊस थांबला, उन्हाचा चटकाही वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:28 IST2021-08-26T04:28:39+5:302021-08-26T04:28:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाला तोंड देत असताना आता बदलत्या हवामानाचा सामनाही नागरिकांना करावा लागत आहे. पाऊस थांबला ...

तब्येत सांभाळा, पाऊस थांबला, उन्हाचा चटकाही वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाला तोंड देत असताना आता बदलत्या हवामानाचा सामनाही नागरिकांना करावा लागत आहे. पाऊस थांबला असताना अचानक तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. अशा काळात आरोग्याबाबत अधिक सतर्क रहावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
जिल्ह्यात यंदा महापुराचा सामना नागरिकांना करावा लागला. कोरोनाची लाट ओसरत असतानाच महापुराने हजेरी लावल्याने निम्मा जिल्हा यात भरडून निघाला. महापूर ओसरल्यानंतर विविध आजार तोंड वर काढत आहेत. हवामानातील बदल व दूषित पाण्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होताना दिसत आहे. कोरोनाची लाट अद्याप पूर्णपणे ओसरली नसल्याने बदलत्या हवामानात नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
चौकट
आकडेवारी काय सांगते (सरासरी)
महिना अपेक्षित पाऊस झालेला पाऊस किमान तापमान कमाल तापमान
जून १३७ मि.मी. १५८ मि. मी. २३ ३२
जुलै १०८ मि.मी. २२५ २१ २७
ऑगस्ट ८९ मि.मी. ४७ २२ ३३
चौकट
ऑगस्टमध्ये सर्वांत कमी पाऊस
सांगली जिल्ह्यात ऑगस्टमध्ये सरासरी ८९ मि.मी. पाऊस पडत असतो. यंदा २५ ऑगस्टपर्यंत केवळ ४७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात तीन दिवस मोठ्या पावसाची नोंद झाली. त्यानंतर तुरळक सरींची हजेरी आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी सहा दिवसातही तुरळक पावसाची चिन्हे आहेत.
चौकट
तलावातील पाणीसाठा
प्रकल्प तलाव संख्या साठा (टक्के)
लघु ७८ ४० टक्के
मध्यम ५ ५३
एकूण ८३ ४५
चौकट
वातावरण बदलले काळजी घ्या
दमट वातावरणामुळे डासांची पैदास वाढून मलेरिया, डेंग्यू व इतर साथीच्या राेगांचे आक्रमण वाढले आहे.
- जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे.
- काेराेना व सामान्य तापाची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.