कृष्णेत पारदर्शक कारभारासाठी पाठीशी राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST2021-04-09T04:29:24+5:302021-04-09T04:29:24+5:30

नेर्ले (ता. वाळवा) येथे सभासद संपर्क दौऱ्यात डॉ. सुरेश भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, ...

Stay back in Krishna for transparent governance | कृष्णेत पारदर्शक कारभारासाठी पाठीशी राहा

कृष्णेत पारदर्शक कारभारासाठी पाठीशी राहा

नेर्ले (ता. वाळवा) येथे सभासद संपर्क दौऱ्यात डॉ. सुरेश भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, सुभाष पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

नेर्ले : राज्यात पहिल्या पाचमध्ये असलेल्या कृष्णा साखर कारखान्याच्या कामकाजाबाबत दिशाभूल करून सभासदांमध्ये गैरसमज पसरवण्याचे एकमेव काम विरोधकांच्याकडे शिल्लक राहिले आहे. कृष्णेत पुन्हा गैरव्यवहार होऊ नयेत म्हणून सभासदांनी जागरूक राहून सहकार पॅनलच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन य. मो. कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भेसले यांनी केले.

नेर्ले (ता. वाळवा) येथे संपर्क दौऱ्यानिमित्त आयोजित केलेल्या सभासद बैठकीवेळी ते बोलत होते. माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यावेळी अध्यक्षस्थानी होते.

डॉ. भोसले म्हणाले की, उसाला सरासरी दर चांगला दिला असून सिंचन योजनाही पूर्ण क्षमतेने चालवल्या आहेत. नेर्ले हे गाव सर्वाधिक ऊस देणारे गाव असून अत्यंत संवेदनशील असून येथील सभासद जागरूक आहेत. संस्थेचे भले-बुरे त्यांना समजते.

मदनराव मोहिते म्हणाले, संघषार्मुळे संस्थेचे फार मोठे नुकसान झाले. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन केलेल्या कामामुळे कारखाना वाचला आहे व स्थिर झाला आहे.

यावेळी माजी सरपंच जयकर कदम, सुभाष बाबूराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पै. सुनील पाटील यांनी आभार मानले.

यावेळी दादा ताटे, सुनील पाटील, धनाजी पाटील, बाजीराव पाटील व पैलवान ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी भोसले गटात प्रवेश केला. यावेळी उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, धोंडिराम जाधव, दिलीप पाटील, गिरीश पाटील, दीपक पाटील उपस्थित होते.

Web Title: Stay back in Krishna for transparent governance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.