कुपवाडमधील समस्यांचे नगरविकास मंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:07 IST2021-01-13T05:07:32+5:302021-01-13T05:07:32+5:30
कुपवाड : प्रशासनाने नागरिकांवर अन्यायी पद्धतीने उपभोक्ता कर लावला आहे. हा कर त्वरित रद्द करावा, अशी मागणी कुपवाड शहर ...

कुपवाडमधील समस्यांचे नगरविकास मंत्र्यांना निवेदन
कुपवाड : प्रशासनाने नागरिकांवर अन्यायी पद्धतीने उपभोक्ता कर लावला आहे. हा कर त्वरित रद्द करावा, अशी मागणी कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीच्या वतीने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकतीच करण्यात आली.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी परिसरातील समस्यांचा पाढा नगरविकास मंत्र्यांसमोर वाचला.
महापालिकेने घरपट्टीच्या माध्यमातून हा कर लावून लूट सुरू केली आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा उपभोक्ता कर त्वरित रद्द करण्यात यावा यासाठीचे निवेदन संघर्ष समितीच्या वतीने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष सनी धोतरे, कार्याध्यक्ष अनिल कवठेकर, विलास माळी, सागर खोत, अमोल कदम, संदीप कांबळे उपस्थित होते.