बलवडीतील प्रलंबित रस्त्याबाबत तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:25 IST2021-05-22T04:25:13+5:302021-05-22T04:25:13+5:30
यावेळी तांदळगावचे विकास चव्हाण उपस्थित होते. कंपनीचे प्रकल्प अधिकारी, सार्वजनिक बांधकाम इस्लामपूर उपविभागाचे अभियंता यांचेकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल ...

बलवडीतील प्रलंबित रस्त्याबाबत तहसीलदारांना निवेदन
यावेळी तांदळगावचे विकास चव्हाण उपस्थित होते. कंपनीचे प्रकल्प अधिकारी, सार्वजनिक बांधकाम इस्लामपूर उपविभागाचे अभियंता यांचेकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली गेली नाही. खड्ड्यामुळे अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी तत्काळ होणे आवश्यक आहे. ठेकेदाराकडून विटा नगरपालिका पाणी पुरवठा पाइपलाइनची अडचण सांगितली जात होती. विटा नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील यांनी याबाबत संबंधित ठेकेदार कंपनीकडून फक्त लिकेज काढण्याबाबत पत्रव्यवहार झाला असून पाइपलाइन काढणे बाबत कोणताही पत्रव्यवहार झाला नाही. तहसीलदार शेळके यांनी संबंधित ठेकेदाराने याबाबत वेळकाढूपणा न करता तत्काळ रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याबाबत सूचना दिली आहे. ठेकेदाराने काम न केल्यास दि. ५ जून रोजी बलवडी(भा) येथील एस. टी. बस थांब्यात आमरण उपोषण करण्याचा इशारा संतोष जाधव यांनी दिला आहे.