मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे नायब तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:25 IST2021-05-23T04:25:56+5:302021-05-23T04:25:56+5:30
घाटनांद्रे : मागासवर्गीय प्राथमिक शिक्षक संघटनेची कवठेमहांकाळ शाखा व विविध संघटनांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन कवठेमहांकाळच्या तहसीलदारांना देण्यात आले. ...

मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे नायब तहसीलदारांना निवेदन
घाटनांद्रे : मागासवर्गीय प्राथमिक शिक्षक संघटनेची कवठेमहांकाळ शाखा व विविध संघटनांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन कवठेमहांकाळच्या तहसीलदारांना देण्यात आले. नायब तहसीलदार सुरेखा गोरे यांनी ते स्वीकारले.
मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील ३३ टक्के आरक्षण रद्द करणारा शासनाचा निर्णय असंविधानिक आणि बेकायदेशीर असल्याने तो तात्काळ रद्द करण्यात यावा, पदोन्नतीची ३३ टक्के रिक्त पदे बिंदुनामावलीनुसार तात्काळ भरण्यात यावीत, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आला आहे.
राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना तालुकाध्यक्ष संजय साबळे, जुनी पेन्शन हक्क संघटना तालुकाध्यक्ष संदीप माने, पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुनील माळवदे, प्राथमिक शिक्षक विकास पतसंस्थेचे उपाध्यक्ष उमराव रास्ते, डी. आर. गुरव, संजय बेरड, एन. डी. कांबळे, संदीप माने, दादासाहेब माने, चंद्रकांत सातपुते, वंदना माळवदे उपस्थित होते.