सोमलिंग तलावाच्या दक्षिण बाजूचा माती मुरूम काढल्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST2021-04-19T04:24:27+5:302021-04-19T04:24:27+5:30

आष्टा येथील सोमलिंग तलावासमोरील टेकडीच्या दक्षिण बाजूचा भराव शेतकऱ्यांनी काढल्याने रस्ता कमकुवत झाला आहे. लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : ...

Statement to the Chief Minister regarding removal of soil pimples on the south side of Somling Lake | सोमलिंग तलावाच्या दक्षिण बाजूचा माती मुरूम काढल्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सोमलिंग तलावाच्या दक्षिण बाजूचा माती मुरूम काढल्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

आष्टा येथील सोमलिंग तलावासमोरील टेकडीच्या दक्षिण बाजूचा भराव शेतकऱ्यांनी काढल्याने रस्ता कमकुवत झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा शहरातील सोमेश्वर मंदिर तलावाच्या दक्षिण बाजूच्या शेतकऱ्यांनी माती व मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी श्री सोमेश्वर मंदिर जीर्णोद्धार कमिटीच्यावतीने आष्टा पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे.

अध्यक्ष व सचिव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोमेश्वर मंदिर हे आष्टा शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरासमोर तलाव आहे. या तलावाच्या पूर्वेकडील बाजूने मंदिरात येण्यासाठी रस्ता आहे. या तलावाच्या दक्षिण बाजूला असलेल्या काही शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी दिनांक १० ते १६ एप्रिलअखेर दक्षिण बाजूने जेसीबीने सुमारे २०० ते २५० ब्रास माती व मुरूम ट्रॅक्टर आणि डंपरच्या साह्याने काढले आहे. टेकडीचा भराव काढल्याने पालिकेचा रस्ता कमकुवत झाला आहे. पालिकेने या घटनेची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Statement to the Chief Minister regarding removal of soil pimples on the south side of Somling Lake