तायक्वांदो स्पर्धेसाठी राज्य संघ जाहीर
By Admin | Updated: June 12, 2015 00:35 IST2015-06-11T23:08:08+5:302015-06-12T00:35:41+5:30
इस्लामपुरात निवड : हरियाणात होणार स्पर्धा

तायक्वांदो स्पर्धेसाठी राज्य संघ जाहीर
fgसांगली : रोहतक (हरियाणा) येथे होणाऱ्या राष्ट्रीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला असल्याची माहिती महाराष्ट्र तायक्वांदो संघटनेचे सरचिटणीस संदीप ओंबासे व राष्ट्रीय प्रशिक्षक सुरेश चौधरी यांनी दिली.
इस्लामपूर (ता. वाळवा) येथील विद्यामंदिर प्रशालेत निवड चाचणी स्पर्धा पार पडली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र तायक्वांदो संघटनेचे सरचिटणीस संदीप ओंबासे होते.
पंच म्हणून राष्ट्रीय प्रशिक्षक सुरेश चौधरी व भास्कर करकेरा यांनी काम पाहिले. आनंदराव नलवडे, सुनील खिलारे, सुभाष खिलारे, प्रमोद कुचीवाले, प्रसाद कुलकर्णी, गफ्फार पठाण आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राचा तायक्वांदो संघ असा : मुले : मयूर कदम (पुणे), योगेश चव्हाण (धुळे), शिवानंद जोडमोते (सोलापूर), ऋत्विक भावे (पुणे), ओंकार बाधे (पुणे), आदित्य रेळेकर (सांगली), पियुष काथायत (मुंबई शहर), आशुतोष भारती (नाशिक), शंतनू शिंगारे (सांगली), प्रीतम पोटे (सांगली).
मुली : गौरी मुंडवेकर (पुणे), प्रतीक्षा चव्हाण (सोलापूर), मनस्वी अंदूरकर (पुणे), अर्पिता गंगार्डे (पुणे), रागिणी जयस्वार (मुंबई शहर), प्रियांका पाटोळे (सांगली), वैष्णवी साळुंखे (सांगली), सोनिया सावंत (मुंबई शहर), सोनाली जिंगार (सांगली), श्रुती बंडगर (मुंबई शहर). (क्रीडा प्रतिनिधी)