कुपवाडमध्ये राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धा
By Admin | Updated: October 23, 2014 00:15 IST2014-10-23T00:12:59+5:302014-10-23T00:15:16+5:30
रविवारपासून आयोजन : महाराष्ट्र संघाची होणार निवड

कुपवाडमध्ये राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धा
हरिपूर : कुपवाड (ता. मिरज) येथे राज्यस्तरीय अॅरोबिक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष तानाजी घार्गे व सचिव दीपक सावंत दिली.
२६ व २७ आॅक्टोबरला नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या सभागृहात या स्पर्धा होणार आहेत. राज्यातील ३५० पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील. अॅरोबिक्स हा स्वतंत्र खेळ प्रकार होता.
पाच वर्षांपूर्वी अॅरोबिक्सचा जिम्नस्टिकमध्ये एक खेळप्रकार म्हणून समावेश झाला. शारीरिक चपळता, लयबद्ध हालचाली, वेळ आणि वेगावर हा खेळ पूर्णपणे अवलंबून आहे. खेळताना थोडासा जरी ‘बॅलन्स’ चुकला की खेळाडूचे श्रम वाया जातात.
स्पर्धेचे उद्घाटन २६ रोजी सकाळी साडेदहा वाजता आ. सुरेश खाडे व जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र अॅमॅच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशनचे सचिव महेंद्र चेंबुरकर, उपाध्यक्ष गौतम पाटील, सूरज फौंडेशनचे सचिव एन. जी. कामत, टी. कृष्णमूर्ती, हरिभाऊ साळुंखे, प्रमोद चौगुले, प्रा. रमेश चराटे उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार असल्याची माहिती दीपक सावंत यांनी यावेळी दिली. (वार्ताहर)
स्पर्धा संयोजन समिती
अध्यक्ष : तानाजी घार्गे
उपाध्यक्ष : संजय चौगुले
सचिव : दीपक सावंत
सहसचिव : डॉ. सुहास व्हटकर
विनायक जोशी
डॉ. सुधीर शहा
प्रा. रमेश चराटे
हेमंत सावंत
प्रवीण जाधव
काजल काळे