रिक्षा संघटनांच्या राज्यस्तरीय परिषदचे पनवेल येथे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST2021-09-22T04:29:47+5:302021-09-22T04:29:47+5:30
सांगली : स्वाभिमानी रिक्षा मंचाने राज्यातील ऑटोरिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची दोनदिवसीय राज्यस्तरीय परिषद नवी मुंबईत पनवेल येथे आयोजित केली आहे. ...

रिक्षा संघटनांच्या राज्यस्तरीय परिषदचे पनवेल येथे आयोजन
सांगली : स्वाभिमानी रिक्षा मंचाने राज्यातील ऑटोरिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची दोनदिवसीय राज्यस्तरीय परिषद नवी मुंबईत पनवेल येथे आयोजित केली आहे. २५ व २६ सप्टेंबर रोजी श्री. संत सावंता माळी सभागृहात ती होईल. ३६ जिल्ह्यांतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रात प्रथमच रिक्षाचालकांची अशी परिषद होत आहे. रिक्षाचालकांसाठी जाहीर झालेल्या कल्याण मंडळाची त्वरित अंमलबजावणी करावी, रिक्षाचालकांच्या प्रतिनिधीला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळावे, रिक्षांचे खुले परवाने तत्काळ बंद करावेत, वाढलेली संख्या लक्षात घेऊन प्रत्येक शहरात नवे थांबे निर्माण करून द्यावेत, कागदपत्रांना ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी अशा मागण्यांवर परिषदेत विचारमंथन होईल.
परिषदेच्या पूर्वतयारीसाठी सांगलीत रिक्षाचालकांची बैठक झाली, यावेळी जिल्हाध्यक्ष महेश चौगुले, राजू रसाळ, बाळू खतीब, तुषार मोहिते, अरिफ शेख, बंडू तोडकर, सलीम मलिदवाले, मोहसीन पठाण, अमीन मुल्ला, सुहास कांबळे, बाबासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.