राज्य सरकारने लोकायुक्त कायदा तातडीने करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST2021-09-19T04:27:54+5:302021-09-19T04:27:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर येत आहेत. वाढत्या भ्रष्टाचारामुळे ...

The state government should enact the Lokayukta Act immediately | राज्य सरकारने लोकायुक्त कायदा तातडीने करावा

राज्य सरकारने लोकायुक्त कायदा तातडीने करावा

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर येत आहेत. वाढत्या भ्रष्टाचारामुळे सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला रोखणारा लोकपाल कायद्यांतर्गत सक्षम लोकायुक्त कायदा करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे संघटक वीरेंद्र राजमाने यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांना दिले आहे. राज्यात लोकायुक्त कायदा होण्यासाठी अण्णा हजारे वयाच्या ८५ व्या वर्षी आंदोलन करण्याच्या प्रयत्नात आहेत. तरी राज्य शासनाने हा कायदा करून त्यांना आंदोलनापासून परावृत्त करावे, अन्यथा सांगली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आंदोलन करणार असल्याचे राजमाने यांनी स्पष्ट केले.

यावेळी जितेंद्र ढबु, डॉ. अभिषेक राजमाने, संजय व्हणखडे, किरण कंठे, संभाजी ओलेकर, बसवेश्वर जमखंडे, ॲड. किरण पाटील, विनोद कुलकर्णी उपस्थित होते.

Web Title: The state government should enact the Lokayukta Act immediately