शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाचे अधिकारी परप्रांतीय ठेकेदारांना सामील, मंत्री उदय सामंतांचा सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 13:56 IST

कामगार मंडळातही राजकारण सुरु आहे. कामगार कल्याण निधीचे १३ हजार कोटी रुपये या मंडळाकडे पडून आहेत. ते राज्य सरकारने कामगारांसाठी खर्च केले पाहिजेत.

सांगली : कामगार विभागातील अधिकारी हे परप्रांतीय ठेकेदारांना ताकद देत असल्याने स्थानिक कामगारांवर अन्याय होत आहे. शिवसेना म्हणून आम्ही हे खपवून घेणार नाही. प्रसंगी कामगारांच्या आंदोलन मी स्वत: उतरेन, असा इशारा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला.कुपवाड येथील चाणक्य चौकात शिवसेनेच्यावतीने काल, रविवारी कामगार मेळावा पार पडला. यावेळी मंत्री सामंत बोलत होते. मेळाव्यास आमदार अनिल बाबर, जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार, बजरंग पाटील, शंभोराज काटकर आदी उपस्थित होते.मंत्री सामंत यांनी भाषणातून राष्ट्रवादीकडे असलेल्या कामगार खात्याला घरचा आहेर दिला. ते म्हणाले की, कामगार खात्यातील अधिकारी हे कामगारांमध्ये आपसांत भांडणे लावतात. असे अधिकारी हे परप्रांतीय ठेकेदारांना मोठी ताकत देत असल्याचे दिसून आले आहे. मी कामगारमंत्री नसलो तरी शिवसेनेचा मंत्री म्हणून स्थानिकांवर अन्याय खपवून घेणार नाही. स्थानिकांच्या खच्चीकरणाची भूमिका ठेकेदारांनी घेतली आणि अधिकारी जर सामील असतील तर शिवसेना गप्प बसणार नाही.ते म्हणाले की, काही उपद्रवी लोकांचा उल्लेख याठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला, मात्र मी येथील पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की मी सिंधुदुर्गचा पालकमंत्री आहे. या गोष्टीत सर्व प्रश्नांची उत्तरे आली. काही लोकांचा उल्लेख करुन त्यांना मोठे करण्याची गरज नाही.

विद्यापीठ कामगारांसाठी लवकरच चांगला निर्णय

सामंत म्हणाले की, कामगार कायद्यानुसार कामगारांना जे कायदे लागू आहेत, ते सर्व कायदे यापुढे विद्यापीठातील सफाईकाम, माळी काम करणाऱ्या कामगारांना तसेच कंत्राटी कामगारांना लागू केले जातील. त्यामुळे त्यांना किमान वेतनही मिळणार आहे. येत्या १५ दिवसात हा निर्णय राज्यसरकार घेणार आहे.

१३ हजार कोटी खर्च करासामंत म्हणाले की, कामगार मंडळातही राजकारण सुरु आहे. कामगार कल्याण निधीचे १३ हजार कोटी रुपये या मंडळाकडे पडून आहेत. ते राज्य सरकारने कामगारांसाठी खर्च केले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांना सांगून आम्ही हा निधी खर्च करायला लावू. तसे झाले तर राज्यातील संपूर्ण कामगार वर्ग कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहील.

पंचनामे का नाहीत?

सामंत म्हणाले की, भोसे येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांशी मी संवाद साधला. त्यावेळी त्यांच्या शेतीचे पंचनामे अद्याप झाले नसल्याचे कळाले. ही शोकांतिका आहे. अधिकाऱ्यांनी तत्परतेने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.

टॅग्स :SangliसांगलीUday Samantउदय सामंतuniversityविद्यापीठ