जिल्हा परिषद शाळा सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:30 IST2021-08-28T04:30:50+5:302021-08-28T04:30:50+5:30
सांगली : जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा कोरोनाच्या नियमांचे पालन करून सुरू कराव्यात, अशा मागणीचा ठरावही शुक्रवारी शिक्षण समितीच्या बैठकीत ...

जिल्हा परिषद शाळा सुरू करा
सांगली : जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा कोरोनाच्या नियमांचे पालन करून सुरू कराव्यात, अशा मागणीचा ठरावही शुक्रवारी शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके गेली पाहिजेत, अशा सक्त सूचना शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती शिक्षण समितीच्या सभापती आशाताई पाटील यांनी दिली.
आशाताई पाटील म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होणे गरजेचे आहे, अशी सदस्यांनी मागणी केली. त्यानुसार जिल्हा परिषद शाळा कोरोनाचे नियम पाळून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरू करताना गावातील कोरोना रुग्णांच्या परिस्थितीचा विचार मुख्याध्यापकांनी केला पाहिजे. याबाबतचे लेखी आदेशही अधिकाऱ्यांनी काढावा, अशीही सूचना दिली आहे. तसेच जिल्ह्यात पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत. पण, अनेक विद्यार्थ्यांपर्यंत मिळाली नाहीत, अशा तक्रारी होत्या. याबाबत सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांपर्यंत तात्काळ पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.
या बैठकीस शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, सुरेंद्र वाळवेकर, शिक्षक समिती प्रतिनिधी बाबासाहेब लाड आदी उपस्थित होते.