शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अजब मागणी! सांगली जिल्ह्यात मटका सुरू करा, आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल 

By शरद जाधव | Updated: April 28, 2023 18:49 IST

विश्रामबाग पोलिसांकडून कारवाई

सांगली : राज्यात व जिल्ह्यात मटका सुरू करावा, अशी मागणी करत आंदोलन करणाऱ्यांवर अखेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. समाजविघातक मागणी करून बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राष्ट्रविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड, प्रदेशाध्यक्ष आमोस मोरे, युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते, विक्रम मोहिते, संजय माेहिते व अन्य तिघांचा समावेश आहे.सोमवारी (दि. २४) राष्ट्रविकास सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. यात राज्यात व जिल्ह्यात मटका सुरू करण्यात यावा अशी अजब मागणी करण्यात आली. या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत घोषणाबाजीही केली होती. आंदोलनकर्त्यांनी मटका सुरू करावा अशी समाजविघातक मागणी केल्याने याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली.जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आदेश दिला असतानाही अशाप्रकारे आंदोलन करण्यात आल्याने पोलिसांनी सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, सद्दाम मुजावर, संजय मोटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस