कसबे डिग्रजला कोरोना लसीकरण केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:28 IST2021-04-02T04:28:26+5:302021-04-02T04:28:26+5:30
कसबे डिग्रज : सध्या कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कसबे डिग्रज आरोग्य केंद्रामध्ये कसबे डिग्रजसह तुंग व ...

कसबे डिग्रजला कोरोना लसीकरण केंद्र सुरू करा
कसबे डिग्रज
: सध्या कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कसबे डिग्रज आरोग्य केंद्रामध्ये कसबे डिग्रजसह तुंग व मौजे डिग्रजसाठी कोरोना लसीकरण केंद्र सुरू झाले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये करण्यात आली. याबाबतचे निवेदनही देण्यात आले आहे.
कसबे डिग्रज व तुंगसाठी कवठेपिरान येथे आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे या दोन्ही गावातील नागरिकांना ते ठिकाण गैरसोयीचे आहे. ये-जा करण्यासाठी वाहतुकीचे साधन उपलब्ध नाही. वेळेचा व पैशाचा फटका बसत आहे. मौजे डिग्रज हे गाव नांद्रे आरोग्य केंद्रांतर्गत येते, परंतु नांद्रे येथे ये-जा करण्यासाठी मौजे डिग्रज या नागरिकांना ते गैरसोयीचे आहे. याउलट तुंग व मौजे डिग्रज या दोन्ही गावांसाठी कसबे डिग्रजचे अंतर अतिशय कमी आहे. याचा फायदा या दोन्ही गावच्या नागरिकांना होऊ शकतो. कसबे डिग्रजमध्ये आरोग्य केंद्राची जागा मोठी असून, गरज पडल्यास ग्रामपंचायतीच्या पाठीमागे असणारे समाज मंदिरही काही दिवसांकरिता लसीकरणासाठी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने कसबे डिग्रजमध्ये कोरोना लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी या बैठकीमध्ये करण्यात आली.
बैठकीसाठी आनंदराव नलावडे, सरपंच किरण लोंढे, उपसरपंच सागर चव्हाण, कुमार लोंढे, भरत देशमुख, राहुल जाधव, सुधीर देशमुख, संजय शिंदे, प्रमोद चव्हाण, संदीप निकम उपस्थित होते.