स्थायी समितीची सभा तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:32 IST2021-02-17T04:32:03+5:302021-02-17T04:32:03+5:30

सांगली : महापालिकेच्या आयुक्त, उपायुक्तांसह प्रमुख खातेप्रमुख मुंबईत विधिमंडळाच्या अंदाज समितीसमोर साक्षीसाठी गेल्याने स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली. ...

Standing Committee meeting scheduled | स्थायी समितीची सभा तहकूब

स्थायी समितीची सभा तहकूब

सांगली : महापालिकेच्या आयुक्त, उपायुक्तांसह प्रमुख खातेप्रमुख मुंबईत विधिमंडळाच्या अंदाज समितीसमोर साक्षीसाठी गेल्याने स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली. आता बुधवारी सभेचे कामकाज होणार असून, ६० कोटींच्या एलईडी प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत महापालिका क्षेत्रात एलईडी दिवे बसविण्यासाठी निविदा मागविण्याचा विषय अजेंड्यावर होता; पण सभेला बहुतांश खातेप्रमुख अनुपस्थित होते. आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख दोन दिवसांपासून मुंबईत आहेत. विधिमंडळाच्या अंदाज समितीने २०१८ मध्ये महापालिकेची तपासणी केली होती. त्याअनुषंगाने या समितीचे अध्यक्ष आमदार रणजित कांबळे यांच्यासमोर मंगळवारी नगरविकास सचिवांची साक्ष होती. या साक्षीसाठी आयुक्तांसह सर्व विभागप्रमुख मुंबईला गेले आहेत. ते बुधवारी सांगलीला परत येणार आहेत. त्यामुळे स्थायी समिती सभा बुधवारपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय सभापती कोरे यांनी घेतला.

Web Title: Standing Committee meeting scheduled