तासगावात स्टॅम्प विक्रेत्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:41 IST2020-12-16T04:41:30+5:302020-12-16T04:41:30+5:30

तासगाव तहसील कार्यालयात स्टँप विक्रेते स्टँप विकतात. मंगळवारी एका विक्रेत्याचे स्टँप संपल्याने त्याने नागरिकांना दुसऱ्याचे नाव सांगत, ‘त्यांच्याकडून ...

Stamp seller beaten in Tasgaon | तासगावात स्टॅम्प विक्रेत्याला मारहाण

तासगावात स्टॅम्प विक्रेत्याला मारहाण

तासगाव तहसील कार्यालयात स्टँप विक्रेते स्टँप विकतात. मंगळवारी एका विक्रेत्याचे स्टँप संपल्याने त्याने नागरिकांना दुसऱ्याचे नाव सांगत, ‘त्यांच्याकडून घ्या, त्यांच्याकडे आहेत’ असे सांगितले. संबंधित व्यक्तीने त्या विक्रेत्याकडे जाऊन, शेजारच्या विक्रेत्याने पाठविल्याचे सांगितले. याचा त्या विक्रेत्याला राग आला. ‘माझ्याकडे स्टँप आहेत, असे का सांगितलेस’ असे म्हणत त्या विक्रेत्याने दुसऱ्या विक्रेत्याला शिवीगाळ करत हातांनी व लाथांनी मारहाण केली. अचानक झालेल्या प्रकाराने सर्वत्र गोंधळ उडाला. वातावरण तणावपूर्ण बनले. लोकांनी मध्यस्थी करत वाद मिटवला.

मात्र मारहाण करणाऱ्या त्या विक्रेत्याचे अनेक कारनामे आहेत. जादा दराने स्टँप विकल्याच्या कारणावरून त्याच्यावर तीन महिन्यांनी कारवाई देखील झाली होती. तो लोकांना स्टँप देत नसल्याच्या तक्रारी आहेत. या प्रकाराने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. या प्रकाराची चर्चा दिवसभर तासगाव तहसील कार्यालयात होती.

Web Title: Stamp seller beaten in Tasgaon