उमदी-विजापूर रस्त्याचे रखडलेले काम लवकरच पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:26 IST2021-02-13T04:26:35+5:302021-02-13T04:26:35+5:30

मुल्ला म्हणाले की, विरोधकांनी हा रस्ता माजी आमदार विलासराव जगताप व कर्नाटकातील विजापूर येथील खासदार रमेश जिगजिनगी यांनी केल्याचा ...

The stalled work of Umadi-Bijapur road will be completed soon | उमदी-विजापूर रस्त्याचे रखडलेले काम लवकरच पूर्ण

उमदी-विजापूर रस्त्याचे रखडलेले काम लवकरच पूर्ण

मुल्ला म्हणाले की, विरोधकांनी हा रस्ता माजी आमदार विलासराव जगताप व कर्नाटकातील विजापूर येथील खासदार रमेश जिगजिनगी यांनी केल्याचा बोभाटा केला आहे. जगताप पाच वर्षे आमदार असताना व त्यांचे गाव राष्ट्रीय महामार्गालगत असतान ते पाच वर्षे गप्प का बसले? विजापूरच्या खासदारांनी हा रस्ता मंजूर केला, असे सांगता, तर तुमच्याच पक्षाचे सांगलीचे खासदार निष्क्रिय आहेत काय? विरोधकांनी प्रसिद्धीसाठी चुकीच्या अफवा पसरवणे थांबवावे. अहमदनगर व विजापूर या राष्ट्रीय महामार्गामधील उमदी ते विजापूर रखडलेले काम आमदार विक्रम सावंत व बिराजदार यांनी मंजूर करुन आणले आहे. ते लवकरच पूर्ण होणार आहे. आमचे राजकीय विरोधक असले, तरी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांचादेखील हा रस्ता मंजूर होण्यासाठी मोठा वाटा आहे.

यावेळी निवृत्ती शिंदे, रमेश हळके, बंडा शेवाळे, डॉ. एल. बी. लोणी उपस्थित होते.

Web Title: The stalled work of Umadi-Bijapur road will be completed soon