शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

तासगावमधील शाळांच्या जागांवर कारभाऱ्यांचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:15 IST

तासगाव नगरपालिकेच्या शाळांच्या जागांवर पालिकेतील कारभाऱ्यांचा डोळा असल्याचे चित्र काही निर्णयांतून दिसत आहे. यापूर्वी पालिकेच्या बारा नंबर शाळेच्या मैदानाचा निर्णय हाणून पाडण्यात आला होता. आता पुन्हा अकरा नंबर शाळेच्या मैदानावरच

ठळक मुद्देनागरिकांचा रोष : अकरा नंबर शाळेच्या मैदानावर जलशुध्दीकरण प्रकल्पाचा घाट

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या शाळांच्या जागांवर पालिकेतील कारभाऱ्यांचा डोळा असल्याचे चित्र काही निर्णयांतून दिसत आहे. यापूर्वी पालिकेच्या बारा नंबर शाळेच्या मैदानाचा निर्णय हाणून पाडण्यात आला होता. आता पुन्हा अकरा नंबर शाळेच्या मैदानावरच जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्याचा घाट घालण्यात आला असून, याला नागरिकांतून तीव्र विरोध होत आहे.

तासगाव नगरपालिकेच्या शहरात विविध ठिकाणी १६ शाळा आहेत. तासगाव शहरातील अनेक पिढ्या या पालिकेच्या शाळांतून तयार झालेल्या आहेत. बदलत्या शिक्षणपध्दतीनुसार अलीकडच्या काळात अन्य शाळांसारखीच पालिकेच्या शाळांतील पटसंख्येतदेखील घसरण झाली आहे. पालिकेच्या पटसंख्येची घसरण थांबविण्यासाठी शिक्षण सभापती किशोर गायकवाड यांच्याकडून गेल्या काही वर्षात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. सेमी इंग्रजीदेखील सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे अपवाद म्हणून अशा गोष्टी सुरु असताना, दुसरीकडे पालिकेच्या शाळांच्या जागा कारभाºयांच्या डोळ्यात घर करून बसलेल्या आहेत. शाळांच्या जागेवर शैक्षणिक उपक्रम राबविण्याऐवजी, या जागा अन्य कारणांचे निमित्त करून ताब्यात घेण्याचा डाव पालिकेच्या कारभाºयांकडून सुरु आहे.

यापूर्वी सिध्देश्वर चौकातील बारा नंबरच्या शाळेची इमारत बांधकाम करताना, त्याठिकाणी व्यापारी संकुल उभारण्याचा घाट घालण्यात आला होता. त्यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी त्याला आक्षेप घेत, न्यायालयीन लढा दिला होता. त्यानंतर मात्र त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय गुंडाळण्यात आला.

या निर्णयानंतर आता पालिकेच्या अकरा नंबरच्या शाळेच्या मैदानावर जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. अकरा नंबर शाळेची ४८ गुंठे जागा आहे. त्यापैकी तब्बल ३० गुंठे जागा जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी ताब्यात घेण्याबाबतचा ठराव करण्यात आला आहे. या ठरावाला अनुसरून पालिकेकडून रितसर हरकती मागविण्यात आलेल्या आहेत.नगरसेवक गप्पशाळेच्या जागेचा शैक्षणिक उद्देश वगळता, अन्य कोणत्याही कारणासाठी वापर होत असताना, सत्ताधारी व विरोधी गटातील एकाही नगरसेवकाने याबाबत शब्दही काढला नाही. या शाळेच्या परिसरातील नागरिकांनी मात्र शाळेच्या जागेवर जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यास विरोध केला आहे. त्यामुळे येणाºया काळात शाळेच्या जागांचे भवितव्य काय? असाही प्रश्न कारभाºयांच्या या निर्णयामुळे उपस्थित झाला आहे.तासगाव नगरपालिकेच्या शाळा क्रमांक ११ च्या याच मैदानावर पालिकेचा जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळा