ST strand rises in rural passenger traffic: | एसटी फेऱ्या कपातीमुळे ग्रामीण प्रवाशांना फटका : -सुटीत मुक्कामी एसटी फेºया बंद
एसटी फेऱ्या कपातीमुळे ग्रामीण प्रवाशांना फटका : -सुटीत मुक्कामी एसटी फेºया बंद

ठळक मुद्देप्रशासनाकडून तोट्याचे कारण

सदानंद औंधे ।
मिरज : वाढत्या तोट्यामुळे एसटीच्या फेºयात कपात करण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. शाळांना सुटी लागल्यामुळे मे महिन्यात अनेक गावांतील मुक्कामी बसेस अनियमित असल्याने प्रवासी वडापवर अवलंबून आहेत. मिरज आगाराला वार्षिक अडीच कोटी तोटा होत असून, कर्नाटक एसटीच्या रोजच्या ३०० फेऱ्यांच्या आक्रमणामुळे मिरज आगार अडचणीत आहे.
एसटीच्या मिरज आगाराकडे ९९ बसेस व ५२१ कर्मचारी आहेत. दररोज ३८ हजार किलोमीटर प्रवासी वाहतूक करण्यात येते. तालुक्यातील ६४ गावांपैकी पूर्व भागातील ३० गावांसाठी मिरज आगारातून एसटी फेºया सुरू आहेत. ग्रामीण भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी वाहतुकीसाठी मिरजेतून लक्ष्मीवाडी, पायापाचीवाडी, भोसे, सोनी, शंभर्गी, जंबगी, खटाव, मणेराजुरी, लिंगनूर, कवठेगुलंद, सलगरे, कौलगे या गावात रात्री उशिरा जाऊन सकाळी परत येणाºया ग्रामीण विभागाच्या १३ व शहरी विभागाच्या ८ मुक्कामी गाड्या सुरू आहेत.

मात्र मुक्कामी गाड्यांसाठी वाहक, चालक उपलब्ध होत नसल्याने, अनेक वेळा या फेºया रद्द होतात. शाळांना सुटी असलेल्या दिवशी मुक्कामी फेरी रद्द करण्यात येते. मे हा सुटीचा महिना असल्याने या कालावधित मुक्कामी गाड्या अनियमित असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना वडापवरच अवलंबून राहावे लागत आहे. यापूर्वी ढवळी व सलगरे रस्ता खराब असल्याने एसटी वाहतूक बंद केली होती. मात्र आता रस्ता झाल्यानंतर वाहतूक परवडत नसल्याने या गावातील एसटी फेºयांत कपात केली आहे. ढवळीला सुटीदिवशी एसटी येत नसल्याने या गावात पूर्वी बंद असलेली वडाप वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.

एसटीचा तोटा वाढत असल्याने कमी उत्पन्न मिळणाºया मुक्कामी गाड्यांची काटछाट करण्यात येते. नरवाडला जाणाºया पाच फेºया कमी करण्यात आल्या आहेत. मिरज पूर्व भागातील अनेक गावात हीच परिस्थिती आहे. तोटा कमी करण्यासाठी एसटीच्या फेºयांतील कपातीमुळे त्याचा फायदा वडाप चालकांना मिळत असल्याने, एसटीचा तोटा वाढतच असल्याचे चित्र आहे. एसटीच्या फेºया कमी झाल्याने ग्रामीण भागात स्वत:ची वाहने असलेल्या सधन मंडळींना याचा त्रास न होता सामान्य गरीब प्रवाशांनाच याचा फटका बसत आहे. एसटी व्यवस्थापनाने ग्रामीण भागातील कमी प्रवासी असलेल्या मार्गावर एसटी फेºया टिकविण्यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

सीमाभागातून ये-जा करणाºया प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र कर्नाटकातून दररोज मिरज-सांगलीत येणाºया बसेसची संख्या सुमारे तीनशेपर्यंत असल्याने, या प्रवासी वाहतुकीचा केवळ दहा टक्के वाटा महाराष्टÑ एसटीला मिळत आहे. आंतरराज्य प्रवासी वाहतुकीच्या कराराप्रमाणे सीमेवरून २० किलोमीटर अंतरापर्यंत प्रवासी वाहतुकीसाठी परवानगीचे बंधन नसल्याने, कर्नाटक सीमेपासून जवळ असलेल्या सांगली, मिरज या मोठ्या शहरांचा फायदा कर्नाटक एसटीला झाला आहे. मिरजेतून अथणी, चिक्कोडी, जमखंडी, विजापूर, बागलकोट या कर्नाटकातील शहरांकडे जाणाºया दैनंदिन फेºया केवळ दहा आहेत. मात्र अथणी, चिक्कोडी व जमखंडी येथून प्रत्येक वीस मिनिटाला कर्नाटक एसटी मिरज-सांगलीला येते.


शाळांना सुटी असल्याने मुक्कामी बसेस बंद
मे महिन्यात शाळांना सुटी असल्याने कमी उत्पन्नाच्या काही मुक्कामी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. प्रवासी कमी असलेल्या मार्गावर एसटी फेºया परवडत नसल्याने, तोटा कमी करण्यासाठी फेºया कमी कराव्या लागत आहेत. प्रवाशांची मात्र कोणतीही गैरसोय होऊ देणार नाही. प्रवाशांच्या मागणीनुसार बसेस सोडल्या जात आहेत. प्रवाशांची सोय करुनच एसटीचा तोटा कमी करण्याला आमचे प्राधान्य आहे. मिरज एसटी आगाराला गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तोटा कमी असून तोटा भरून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मिरज आगाराचे व्यवस्थापक शिवाजीराव खांडेकर यांनी दिली.

नोंदणीपेक्षा : तिप्पट फेºया
कागदोपत्री नोंद असलेल्या फेºयांपेक्षा तिपटीने कर्नाटक एसटीच्या फेºया सुरू असल्याने, कर्नाटक एसटीच्या आक्रमणापुढे महाराष्टÑ एसटीने हात टेकले आहेत. महाराष्टÑ एसटीच्या वेळेत कर्नाटकाच्या अनेक एसटी बसेस धावत असल्याने, कर्नाटकात जाणाºया फेºया सुरू ठेवणे महाराष्टÑ एसटीसाठी अडचणीचे ठरले आहे.


Web Title: ST strand rises in rural passenger traffic:
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.