एसटी कर्मचाऱ्यांना पगार दिला, पण तो फक्त जुलैचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:31 IST2021-09-04T04:31:53+5:302021-09-04T04:31:53+5:30

सांगली : एसटीच्या सांगली विभागातील दहा आगाराकडील ४०७९ कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या पगारासाठी केवळ साडेसहा कोटी रुपये मिळाल्यामुळे जुलैचा पगार ...

ST paid the staff, but only in July | एसटी कर्मचाऱ्यांना पगार दिला, पण तो फक्त जुलैचाच

एसटी कर्मचाऱ्यांना पगार दिला, पण तो फक्त जुलैचाच

सांगली : एसटीच्या सांगली विभागातील दहा आगाराकडील ४०७९ कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या पगारासाठी केवळ साडेसहा कोटी रुपये मिळाल्यामुळे जुलैचा पगार शुक्रवारी मिळाला आहे. पण, ऑगस्टच्या पगारासाठी पुन्हा थांबावे लागणार आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आधीच तुटपुंजा पगार असताना आता दोन महिन्यांचा पगारच झालेला नाही. यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात होते. यावर कर्मचारी संघटनांनी आवाज उठविला होता. आता शासनाने राज्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ५०० कोटी रुपये दिले आहेत. पण, या रकमेतून केवळ जुलैचा पगारच झाला आहे. ऑगस्टचा पगार पुन्हा थकीत राहिला आहे. बसेसला लागणाऱ्या डिझेलसह अन्य साहित्य पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचेही शंभर कोटींहून अधिक थकीत आहेत. यामुळे प्रवासी वाहतूक सुरळीत होईपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार आणि बसेसच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न निर्माण होणार आहे.

कोट

ऑगस्टच्या पगारासाठी निधीची मागणी केली आहे. येत्या आठवड्यात पगाराबाबत निर्णय होईल.

-अरुण वाघाटे, विभाग नियंत्रक

Web Title: ST paid the staff, but only in July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.