जतमध्ये एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 19:21 IST2018-03-17T19:21:22+5:302018-03-17T19:21:22+5:30

ST employees commit suicide in Jat | जतमध्ये एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

जतमध्ये एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

जत : जत शहरातील मरगुबाई गल्ली येथील अश्वीन भीमराव सनदी (वय ४१) याने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतु घरगुती कारणांमुळे त्याने आत्महत्या केली आहे, अशी चर्चा येथे सुरू होती. याप्रकरणी अरुण भीमराव सनदी (रा. मेंढीगिरी, ता. जत) यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

अश्वीन सनदी हे जत एसटी आगारात हेल्पर म्हणून काम करत होते. त्यांनी रजा काढल्याने ते शुक्रवारी कामावर गेले नव्हते. त्यांचे गाव मेंढीगिरी आहे. नोकरीनिमित्त भाड्याने खोली घेऊन ते सहकुटुंब मरगुबाई गल्लीत राहत होते. त्यांना दोन मुले आहेत. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्यादरम्यान घरात कोणी नसल्याचे पाहून त्यांनी विषारी औषध प्राशन केले होते. ही घटना तेथील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर उपचारासाठी त्यांना मिरज येथे घेऊन जात असताना कळंबी (ता. मिरज) जवळ रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जत पोलीस करत आहेत.

Web Title: ST employees commit suicide in Jat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.