शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

ST Bus: ड्रायव्हरच्या हाती स्टेअरिंग, ॲक्सिलेटर महिला कंडक्टरकडे, एसटी कर्मचाऱ्यांचा जुगाड, अन् चाळीस किलोमीटर सुरक्षित धावली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2023 19:37 IST

Sangli: सामान्यांचा आधारवड असलेल्या एसटीचा भोंगळ कारभार वारंवार समोर येतोच. नादुरुस्त गाड्यांमधील प्रवासाचा अनुभव प्रवाशांना अनेकदा येतो. कवठेमहांकाळ ते घाटनांद्रे या बसमध्येही गुरुवारी असाच अनोखा अनुभव प्रवाशांना आला.

- जालिंदर शिंदेघाटनांद्रे  - सामान्यांचा आधारवड असलेल्या एसटीचा भोंगळ कारभार वारंवार समोर येतोच. नादुरुस्त गाड्यांमधील प्रवासाचा अनुभव प्रवाशांना अनेकदा येतो. कवठेमहांकाळ ते घाटनांद्रे या बसमध्येही गुरुवारी असाच अनोखा अनुभव प्रवाशांना आला. ॲक्सिलेटर खराब झालेल्या बसमुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून निष्णात वाहकाने जुगाड केला. स्वत:च्या हाती स्टेअरिंग व दोरी बांधलेला ॲक्सिलेटर महिला वाहकाच्या हाती देऊन प्रवाशांना चाळीस किलोमीटरचा सुरक्षित प्रवास घडविला.

कवठेमहांकाळ एसटी आगाराचा सावळागोंधळ संपता संपेना. अधिकारी बदलले, पण येथील समस्या कायम आहेत. गाड्या वेळेवर लागत नाहीत आणि लागल्याच तर त्याला चालक, वाहक वेळेवर मिळत नाहीत. गाड्यांचे वेळापत्रक नेहमीच विस्कळीत झालेले असते. त्यातच आगारात नादुरुस्त गाड्यांचा मोठा भरणा आहे. ढकलस्टार्ट गाड्यांवर बेभरवशाचा प्रवास सुरु आहे. बसेस कधी बंद पडतील, हे कोणालाही सांगता येत नाही.

गुरुवारी २५ मे रोजी सायंकाळी एक अनोखा प्रवास तालुक्यात घडून आला. सायंकाळी पावणेसहा वाजता निघालेल्या कवठेमहांकाळ-घाटनांद्रे बसमधील ऑक्सिलेटर कुची-जाखापूरदरम्यान अचानक निसटला. बसच्या प्रवाशांची चिंता वाढली. मात्र, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बसचालक एम. ए. पाटील यांनी चांगला जुगाड केला. नादुरुस्त ॲक्सिलेटर दोरीने बांधून ती दोरी महिला वाहक पी. व्ही. देसाई यांच्या हाती दिली. त्यांना ती ॲक्सिलेटरची दोरी योग्यवेळी कमी-जास्त ओढण्यास सांगितली. त्यांच्या मदतीने जाता-येता ४० किलोमीटर अंतर पार करत बस सुरक्षित नेऊन प्रवाशांना आश्चर्याचा धक्का दिला.

प्रवाशांकडून वाहक-चालकाचे कौतुकसायंकाळी प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून वाहक व चालकाने केलेली कसरत प्रवाशांच्या कौतुकाचा विषय ठरली. बसमधून उतरताना सर्वांनी दोघांनाही धन्यवाद दिले. कर्मचारी प्रवाशांसाठी जीवतोड मेहनत घेत असताना महामंडळामार्फत चांगल्या बस का दिल्या जात नाहीत, असा सवाल काही प्रवाशांनी उपस्थित केला.

टॅग्स :state transportएसटीSangliसांगली