शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

श्रीनगरला अडकलेले गलाई बांधव परतले--अजूनही ३० कुटुंबे श्रीनगरमध्ये...

By admin | Updated: September 16, 2014 23:51 IST

आसू आणि हसू : ८० जणांच्या कुटुंबियांत समाधान

विटा : नभातून कोसळणारा मुसळधार पाऊस... पुराच्या पाण्याची वाढलेली पातळी... घराच्या छताचा आधार... सभोवताली काळाकुट्ट अंधार... समोर दिसत असलेला मृत्यू... आणि नातेवाईकांचा तुटलेला धीर... असा थरार अनुभवत आणि मिळेल ते खाऊन आठ-दहा दिवस मृत्यूचा सामना करीत खानापूर, तासगाव, आटपाडी, खटाव आणि माण तालुक्यातील श्रीनगरच्या पुरात अडकलेले शेकडो मराठी गलाई बांधव आज, मंगळवारी सकाळी विटा येथे आपल्या मायभूमीत दाखल झाले. यावेळी या गलाई बांधवांसह त्यांच्या नातेवाईकांच्याही डोळ्यात आसू आणि चेहऱ्यावर हसू उमटले.खानापूर, आटपाडी, तासगाव, कडेगाव तालुक्यातील हजारो मराठी गलाई बांधव सोने-चांदी व्यवसायानिमित्त जम्मू-काश्मीरमध्ये स्थायिक झाले आहेत. तेथे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून झेलम नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात हे शेकडो गलाई बांधव अडकून पडले होते. गावाकडील नातेवाईकांचाही संपर्क तुटला होता. त्यामुळे नातेवाईक हवालदिल झाले होते. सांगलीचे निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे, विट्याचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सौ. अंजली मरोड यांनी विटा व सांगली येथे संपर्क कक्ष सुरू करून, श्रीनगर येथे पुरात अडकलेल्या मराठी गलाई बांधवांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले होते.त्या पार्श्वभूमीवर श्रीनगर प्रशासनाशी संपर्क साधून लाल चौक, महाराजा बझार, कुकर बझार, जैनाकधर आदी भागात पुराच्या पाण्यात अडकलेल्या गलाई बांधवांची यशस्वीरित्या सुटका केली. यावेळी कुर्ली येथील दिल्लीतील गलाई बांधव शहाजीराव पाटील, नेलकरंजीचे गुणवंत भोसले (चंडीगढ), ठाणे येथील हेमंत धनवडे आदींनी प्रयत्न करून पुरात अडकलेल्या गलाई बांधवांना सुखरूप बाहेर काढून त्यांना श्रीनगरहून विशेष विमानाने मुंबई येथे पाठविले.त्यानंतर ठाणे येथील हेमंत धनवडे यांनी स्वखर्चाने सुमारे ८० गलाई बांधव व त्यांच्या कुटुंबियांना खासगी बसने विट्याकडे पाठविले. आज सकाळी विटा येथे बस आल्यानंतर त्यांना पाहताच घोटीखुर्द, रेवणगाव, विसापूर, विटा, सुळेवाडी, ढवळेश्वर, कळंबी, आटपाडी, नेलकरंजी, पळशी, हिवरे या गावांतील नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला. नातेवाईक व गलाई बांधवांच्या डोळ्यात आसू व चेहऱ्यावर हसू दिसून आले. यावेळी विटा येथील सामाजिक कार्यकर्त्या सविता जाधव, हणमंत पाटील, आनंदराव पाटील, रत्नमाला पाटील, संगीता भोसले, वनिता जाधव, प्रवीण मोरे आदींनी गलाई बांधवांचे स्वागत केले. सांगली जिल्हा प्रशासनासह पुराच्या संकटात मदत करणाऱ्या विविध संघटना व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करताना गलाई बांधवांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. (वार्ताहर) सलग दोन ते तीन दिवस पाऊस पडल्याने झेलम नदीला पूर आला होता. नदीपासून अवघ्या ५० ते ७० मीटर अंतरावर लाल चौक आहे. चौथ्या दिवशी अचानक ढगफुटी झाली. त्यामुळे क्षणातच पाण्याचा लोट बाजारपेठेत घुसला. दुकानांची शटर बंद करण्यापूर्वीच पुराचे पाणी पहिल्या मजल्यापर्यंत आले. आम्ही तातडीने जिवाची पर्वा न करता कुटुंबियांसह तिसऱ्या मजल्यावर पोहोचलो. चार ते पाच दिवस आमच्या इमारतीचा दीड मजला पाण्याखाली होता. पाण्यात साहित्याचे मोठे नुकसान झाले. जवानांनी आम्हाला अन्नाची पाकिटे, पाणी, बे्रड पुरविले. ते खाऊन आम्ही सहा दिवस काढले. या सहा दिवसात अंगावर शहारे आणणारा महाप्रलय पाहिला. - धनाजी हसबे, गलाई व्यावसायिक, महाराजा बझार, श्रीनगरअजूनही ३० कुटुंबे श्रीनगरमध्ये...खानापूर, कडेगाव, आटपाडी, माण, खटाव, सांगोला तालुक्यातील एकूण ४० कुटुंबे श्रीनगरच्या लाल चौक, जैनाकधर परिसरात आहेत. नदीचा पूर ओसरल्यानंतर १० कुटुंबे आज, मंगळवारी विटा शहरात दाखल झाली आहेत. उर्वरित गलाई बांधवांची अजून ३० कुटुंबे श्रीनगरमध्ये आहेत. पुराचे पाणी कमी झाल्याने तेथील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले असल्याचे विट्यात दाखल झालेल्या गलाई बांधवांनी सांगितले.