सायली टोपकरला क्रीडा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:31 IST2021-09-06T04:31:09+5:302021-09-06T04:31:09+5:30

इस्लामपूर : दुधारी (ता. वाळवा) येथील तायक्वांदोची राष्ट्रीय खेळाडू सायली मारुती टोपकर हिला मेजर ध्यानचंद सुवर्णलक्ष क्रीडा पुरस्कार देऊन ...

Sports Award to Saily Topkar | सायली टोपकरला क्रीडा पुरस्कार

सायली टोपकरला क्रीडा पुरस्कार

इस्लामपूर : दुधारी (ता. वाळवा) येथील तायक्वांदोची राष्ट्रीय खेळाडू सायली मारुती टोपकर हिला मेजर ध्यानचंद सुवर्णलक्ष क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत संजय बजाज यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, पै. राहुल पवार उपस्थित होते. सायलीला पोलीस साहिल तापेकरी यांचे मार्गदर्शन लाभले. राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, सरपंच अर्जुन पाटील, अर्चना पोळ, उपसरपंच दीपक लकेसर, कुशवंत माने यांनी अभिनंदन केले.

फोटो : ०५ इस्लामपुर ३

ओळ : मिरज येथे सायली टोपकर हिला संजय बजाज यांच्या हस्ते क्रीडा पुरस्कार देण्यात आला. या वेळी दिग्विजय सूर्यवंशी, राहुल पवार, मारुती टोपकर उपस्थित होते.

Web Title: Sports Award to Saily Topkar