आष्ट्यात राष्ट्रवादी युवकच्या ट्रॅक्टर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:26 IST2021-02-10T04:26:12+5:302021-02-10T04:26:12+5:30

आष्टा : वाळवा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आष्टा ते इस्लामपूर ट्रॅक्टर रॅलीला ...

Spontaneous response to the tractor rally of the Nationalist Youth in Ashta | आष्ट्यात राष्ट्रवादी युवकच्या ट्रॅक्टर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

आष्ट्यात राष्ट्रवादी युवकच्या ट्रॅक्टर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

आष्टा : वाळवा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आष्टा ते इस्लामपूर ट्रॅक्टर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

येथे युवक नेते प्रतीक पाटील यांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांना अभिवादन करून ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात केली. यावेळी तालुकाध्यक्ष संग्रामसिंह पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्याणी, रघुनाथ जाधव, झुंजारराव पाटील, राजारामबापू दूध संघाचे संचालक संग्राम फडतरे, व्ही. डी. पाटील, माणिक शेळके, नंदकुमार पाटील, अनिल पाटील, शिवाजी चोरमुले उपस्थित होते.

चौकट

महामार्गावर वाहनांच्या रांगा

आष्टा येथील आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आष्टा व परिसरातील सर्व वाड्या-वस्त्यांवरील सुमारे दोनशे ते अडीचशे ट्रॅक्टर सकाळपासून येण्यास सुरुवात झाली. काही ट्रॅक्टर दुधगाव रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आले. अकरा ते बाराच्या दरम्यान आष्टा येथून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

फोटो : ०९०२२०२१-आयएसएलएम-आष्टा आंदोलन न्यूज

१) ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी युवक नेते प्रतीक जयंत पाटील यांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांना अभिवादन केले. यावेळी संग्राम पाटील उपस्थित होते.

०९०२२०२१-आयएसएलएम-आष्टा ट्रॅक्टर रॅली : आष्टा बसस्थानकासमोर ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात करताना युवक नेते प्रतीक पाटील यांनी स्वत: ट्रॅक्टर चालविला.

Web Title: Spontaneous response to the tractor rally of the Nationalist Youth in Ashta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.