सखी मंचच्या डिब्बा पार्टीस उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:31 IST2021-01-16T04:31:13+5:302021-01-16T04:31:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कोरोना महामारीची तीव्रता कमी झाल्यानंतर लोकमत सखी मंच इस्लामपूर यांच्यावतीने सोशल डिस्टिन्सचा नियम पाळून ...

Spontaneous response to Sakhi Manch's box parties | सखी मंचच्या डिब्बा पार्टीस उत्स्फूर्त प्रतिसाद

सखी मंचच्या डिब्बा पार्टीस उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कोरोना महामारीची तीव्रता कमी झाल्यानंतर लोकमत सखी मंच इस्लामपूर यांच्यावतीने सोशल डिस्टिन्सचा नियम पाळून डिब्बा पार्टीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम महादेव नगर परिसरातील कुसुमगंध बागेत पार पडला. या कार्यक्रमास जवळपास साठहून अधिक विभागीय प्रतिनिधी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन प्रथमेश इलेक्ट्रानिक्सचे मालक रवी सूर्यवंशी, संगीता सूर्यवंशी, सविता सूर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर रवी सूर्यवंशी यांनी विभागीय प्रतिनिधी संगीता साळुंखे, सुरेखा पाटील यांनी मधुर गाणी म्हणून मैफल रंगवली. त्यानंतर फनिगेमचे नियोजन अर्चना शिंदे, रूपाली बलुगडे यांनी केले. त्यानंतर हळदी-कुंकू आणि वाण वाटप करण्यात आले. ब्ल्यू ट्यूथ वाण वाटपचे प्रायोजक प्रथमेश इलेक्ट्रानिक्स आणि आईस्क्रिमचे प्रायोजक हॅप्पी आईस्क्रिम पार्लरच्या संचालिका कविता ओझा यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय प्रतिनिधी वैशाली पाटील यांनी केले.

१५०१२०२१-आयएसएलएम-सखी मंच न्यूज

कुसुमगंध गॉडर्नमध्ये डिब्बा पार्टी आणि हळदी-कुंकू कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Web Title: Spontaneous response to Sakhi Manch's box parties