‘हॅबिटॅट २०१५ ’ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: November 30, 2015 01:12 IST2015-11-30T00:13:45+5:302015-11-30T01:12:28+5:30

बांधकाम क्षेत्रात अनेक बदल घडत आहेत. त्यातही या नवीन तंत्रज्ञानाची ओळख सांगलीकरांपर्यंत पोहोचणे दुरापास्त असताना,

Spontaneous response to 'Habitat 2015' exhibition | ‘हॅबिटॅट २०१५ ’ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हॅबिटॅट २०१५ ’ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली : स्वत:चं घर बांधणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न साकार करण्यासाठी अनेकदा निश्चित मार्गदर्शन मिळत नसल्याने, त्या स्वप्नांची पूर्ती करताना होणारी घुसमट दूर करण्यासाठी इंजिनिअर्स अ‍ॅण्ड आर्किटेक्टस् असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हॅबिटॅट २०१५’ या प्रदर्शनास रविवारी जोरदार प्रतिसाद मिळाला. नामवंत कंपन्यांनी लावलेल्या आपल्या वस्तूंची व बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणाऱ्या लक्षवेधी स्टॉल्सवर जोरदार गर्दी होती. केवळ सांगलीच नव्हे, तर बाहेरगावहून आलेल्या अनेकांनी प्रदर्शनास भेट देत प्रदर्शनाचे कौतुक केले.
सांगलीतील कल्पद्रुम मैदानावर शनिवारपासून ‘हॅबिटॅट २०१५’ या प्रदर्शनास सुरुवात झाली आहे. आज प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी विशेषत: सायंकाळी प्रदर्शनस्थळी गर्दीचा महापूर दिसून आला. बांधकाम क्षेत्रात अनेक बदल घडत आहेत. त्यातही या नवीन तंत्रज्ञानाची ओळख सांगलीकरांपर्यंत पोहोचणे दुरापास्त असताना, इंजिनिअर्स अ‍ॅण्ड आर्किटेक्टस् असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या या प्रदर्शनामुळे बांधकाम क्षेत्रातील नवीन बदल, पर्यावरणपूरक लाइटिंग, टाईल्स, त्याचबरोबर निसर्गपूरक एनर्जी उत्पादनांच्या स्टॉल्सवर नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. बांधकाम क्षेत्रातील देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नामवंत कंपन्यांनी प्रदर्शनात भाग घेतल्याने, आजपर्यंत मुंबई व पुण्यासह मेट्रो शहरांपुरत्याच मर्यादित असणाऱ्या घरबांधणीतील उत्पादनांची ओळख सांगलीकरांनाही होत आहे. प्रदर्शनात असणाऱ्या १२५ स्टॉल्समधून केवळ बांधकामच नव्हे, तर घरबांधणी करताना पर्यावरणाचा समतोल राखला जाईल याची खबरदारी घेणारी उपकरणेही या प्रदर्शनातून पाहण्यास मिळत आहेत.
असोसिएशनचे अध्यक्ष सुहास जनाज, माजी अध्यक्ष प्रमोद परीख, एस. पी. तायवाडे पाटील, प्रमोद चौगुले, रणदीप मोरे, प्रमोद शिंदे, प्रशांत पाटील-मजलेकर, जयंत परीख, केदार टाकवेकर, योगेश लोहोकरे आदी प्रदर्शनाचे नियोजन करीत आहेत. (प्रतिनिधी)

घर बांधणारी प्रत्येक व्यक्ती द्विधा मन:स्थितीत असते. त्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी ‘हॅबिटॅट’ ही संकल्पना असून, यास सांगलीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बांधकाम क्षेत्रात नवनवीन बदल घडत आहेत. प्रदर्शनस्थळी सायंकाळी स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम आयोजित करून स्थानिक कलांना वाव देण्याचा प्रयत्न होत आहे. प्रतिसाद प्रेरणा देणारा आहे.
- प्रमोद परीख, माजी अध्यक्ष, इंजिनिअर्स अ‍ॅण्ड आर्किटेक्टस् असोसिएशन, सांगली
प्रदर्शनस्थळी वाय फाय सेवा
हॅबिटॅट २०१५ प्रदर्शनास मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, प्रदर्शन काळात या परिसरात पूर्णपणे वाय फाय सुविधा पुरविण्यात आल्याने प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले. वाय फाय सुविधेमुळे काही मिनिटात देवाण-घेवाण होत असल्याने सहभागी कंपन्यांनीही आयोजकांच्या या नव्या सुविधेचे स्वागत केले.

Web Title: Spontaneous response to 'Habitat 2015' exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.