कुपवाडमध्ये नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:27 IST2021-04-07T04:27:10+5:302021-04-07T04:27:10+5:30
कुपवाड : सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग दोनचे नगरसेवक प्रकाश ढंग यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाडमध्ये मोफत नेत्र ...

कुपवाडमध्ये नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
कुपवाड : सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग दोनचे नगरसेवक प्रकाश ढंग यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाडमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास शहरातील नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नगरसेवक प्रकाश ढंग यांच्या जनसंपर्क कार्यालयात इंफिगो आय केअर हॉस्पिटल सांगली यांच्या संयोजनातून मोफत नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन प्रकाश ढंग यांच्याहस्ते करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमास अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक ज्येष्ठ महिला, पुरुषांनी व लहान मुलांनी सहभाग नोंदवून नेत्र तपासणी करून घेतली.
यावेळी इंफिगो हॉस्पिटलचे डॉ. उत्सव कवठेकर, डॉ. निखिल यादव, डॉ. प्राजक्ता पवार, गायत्री दवान, अरुणा कांबळे यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली. यावेळी कुपवाडमधील भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.