आष्ट्यात व्यावसायिकांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:25 IST2021-04-12T04:25:16+5:302021-04-12T04:25:16+5:30

आष्टा : आष्टा शहरात वीकेंड लॉकडाऊनला शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील विविध चौका-चौकात पोलीस बंदोबस्त ...

Spontaneous response to the closure of professionals in Ashta | आष्ट्यात व्यावसायिकांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

आष्ट्यात व्यावसायिकांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

आष्टा : आष्टा शहरात वीकेंड लॉकडाऊनला शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील विविध चौका-चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला हाेता.

शनिवार व रविवारी लॉकडाऊनमुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट होता. आष्टा एसटी स्टँड परिसर, रुकडे प्रवेशद्वार ते गोर्डे चौक या डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गावर तसेच झंवर कमान ते दत्त मंदिर परिसरासह चव्हाणवाडी, शिवाजी चौक, अहिल्या चौक, गणपती मंदिर, नगरपालिका गांधी चौक, ज्योतिलिंग चौक, कापड पेठ, शिंदे चौक, चौंडेश्वरी मंदिर, आझाद चौकासह दुधगाव रस्ता या मार्गावरील सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.

आष्टा पोलिसांनी सकाळी शहरातून फेरफटका मारला. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सदामते यांनी नागरिकांना व्यावसायिकांना सूचना दिल्या. एसटी स्टँड चौक, शिंदे चौक यासह शहरातील विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. व्यवसाय बंद असल्याने सर्वत्र शांतता होती. जिल्हा प्रशासनाने बंदमध्ये सवलत द्यावी, अशी व्यावसायिकांच्यातून मागणी होत आहे.

फोटो : ११ आष्टा १

ओळ : आष्टा बसस्थानक चौकात व्यावसायिकांनी बंद पाळला. चौकात पोलीस बंदोबस्त होता.

Web Title: Spontaneous response to the closure of professionals in Ashta