वाळवा येथे रक्तदान महायज्ञास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST2021-07-15T04:19:34+5:302021-07-15T04:19:34+5:30
ओळ : वाळवा येथे रक्तदात्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी राजीव गावडे, ...

वाळवा येथे रक्तदान महायज्ञास उत्स्फूर्त प्रतिसाद
ओळ : वाळवा येथे रक्तदात्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी राजीव गावडे, विक्रम शिंदे, चंद्रशेखर शेळके, एकता जाधव, धनाजी शिंदे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ व अभिनव ग्रुप आणि सर्वपक्षीय कृती समिती, वाळवा यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात वाळवेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. शिबिराचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांच्या हस्ते झाले. शिबिरात ११९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता.
यावेळी वाळवा पंचायत समितीचे उपसभापती नेताजी पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार शेळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका उपाध्यक्ष धनाजी शिंदे, भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष विक्रम शिंदे, मनसे वाळवा तालुका विभागीय अध्यक्ष सचिन कदम, काँग्रेस वाळवा शहर अध्यक्ष अक्षय फाटक, उद्योजक सचिन गणगटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव, ॲड. विक्रमसिंह भोसले, राजेंद्र औंधकर, ग्रामपंचायत सदस्य वर्धमान मगदूम, मिलिंद थोरात, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक चंद्रशेखर शेळके, मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष निरंकार बंडे, अभिनव ग्रुपचे अध्यक्ष राजीव गावडे, उपाध्यक्ष महावीर होरे, श्रीकांत पाटील, ओमकार शिंदे, निलेश शिंदे, रवींद्र खवरे, इरफान लांडगे उपस्थित होते.
शिबिराचे संयोजन सर्वपक्षीय कृती समितीचे धनाजी शिंदे, विक्रम शिंदे, सचिन कदम, अक्षय फाटक. राजीव गावडे, रवींद्र खवरे, निरंकार बंडे, मनोज खवरे, श्रीकांत पाटील, इरफान लांडगे, ओमकार शिंदे, नीलेश शिंदे, सचिन गणगटे, महावीर होरे यांनी केले.
चौकट
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
शिबिरात एकता जाधव, प्रियांका डवंग, कविता धनवडे, ऋतुजा गावडे, उज्ज्वला लोहार, भक्ती जाधव यांच्यासह इतर युवती व महिलांनी रक्तदान करून आदर्श निर्माण केला.
चाैकट
संग्रामसिंह पाटील यांचे ५६ वे रक्तदान
युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांनी या शिबिरात ५६वे रक्तदान केले. वीर सेवादल मध्यवर्ती समितीचे राहुल कोले यांनी ४५वे रक्तदान केले. वाळवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव नायकवडी व ग्रामपंचायत सदस्य वर्धमान मगदूम यांनीही या शिबिरात रक्तदान केले.
चाैकट
यांनी केले रक्तदान...