विटा येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST2021-07-14T04:31:37+5:302021-07-14T04:31:37+5:30
विटा : ‘लोकमत’चे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीदिनानिमित्त सुरू असलेल्या रक्ताचं नातं या रक्तदान ...

विटा येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
विटा : ‘लोकमत’चे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीदिनानिमित्त सुरू असलेल्या रक्ताचं नातं या रक्तदान महायज्ञास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी विटा येथे ‘लोकमत’ आणि लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास विटेकरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विटा येथे सोमवारी आदर्श महाविद्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. माजी आ. अॅड. सदाशिवराव पाटील, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांच्याहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रोटरीचे संस्थापक नगरसेवक किरण तारळेकर, ट्रस्टचे प्रशासन अधिकारी पी. टी. पाटील, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कोरे, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, उपनिरीक्षक पांडुरंग कण्हेरे, प्रा. सुभाष धनवडे उपस्थित होते.
या शिबिरातील रक्तदात्यांना नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांच्याहस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका लता मेटकरी, जयश्री मनगुत्ते, मंगल साठे, राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या पूनम महापुरे उपस्थित होते. मिरजच्या शाश्वत ब्लड बॅँकेने रक्त संकलन केले. या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विटा रोटरी क्लब, विटा यंत्रमाग व देवांग समाज यांचेही या शिबिरासाठी सहकार्य लाभले.
चौकट :
रक्तदात्यांची नावे...
प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कोरे, अमोल तारळेकर, आशिष तारळेकर, राहुल घोरपडे, सायमन उरणकर, सुजाता पेठकर, सलिम मुलाणी, सचिन गोतपागर, विशाल जावीर, अभिषेक भिंगारदेवे, विजयकुमार सावंत, सचिन केंगार, दिलीप जाधव, आशिष म्हेत्रे, अक्षय गोसावी, सौरभ महाडिक, अजय फाळके, प्रवीण कदम, मनोज मोहिते, संतोष सादिगले, ओंकार जाधव, दशरथ फासे, संतोष जाधव, दिनेश शितोळे, धर्मराज सुतार, सिद्धेश मोरे, स्मिता लोहार, नेहा पवार, सुनील जावीर, सागर पाटोळे, अतुल घाडगे, शुभम् चौगुले, संतोष शिंदे, सौरभ चव्हाण, सतीश हेळवी, साद साद मेटकरी, अमोल पानारी, अजित घाडगे, सुरजकुमार घाडगे, इमरान चौगुले, संतोष कदम, रविराज सूर्यवंशी, किरण कदम, राहुल कदम, श्रीनिवास दीक्षित, देवीदास महाडिक, मोहन चिन्ने, शुभम चिनकर, प्रतीक सरोदे या रक्तदात्यांनी रक्तदान करून ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञात सहभाग घेतला.
फोटो - १२०७२०२१-विटा-ब्लड कॅम्प ०१ : विटा येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आ. सदाशिवराव पाटील, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी डावीकडून पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कण्हेरे, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कोरे, सपोनि दत्तात्रय कोळेकर, प्रशासन अधिकारी पी. टी. पाटील, नगरसेवक किरण तारळेकर, ‘लोकमत’चे विटा प्रतिनिधी दिलीप मोहिते, प्रा. सुभाष धनवडे उपस्थित होते.
फोटो - १२०७२०२१-विटा-ब्लड बॅँक ०२ : विटा येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरावेळी रक्तदान केलेले प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कोरे यांना नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका लता मेटकरी, जयश्री मनगुत्ते, मंगल साठे, पूनम महापुरे उपस्थित होते.