विटा येथील रक्तदान शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:27 IST2021-04-20T04:27:16+5:302021-04-20T04:27:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद ...

Spontaneous response to blood donation camp at Vita | विटा येथील रक्तदान शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद

विटा येथील रक्तदान शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आदेशानुसार विटा येथे रविवारी खानापूर तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात १८१ जणांनी रक्तदान केले.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी माजी आमदार सदाशिवराव पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, तालुकाध्यक्ष किसन जानकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष पाटील यांनी खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आदेशानुसार हे रक्तदान शिबिर घेतल्याचे सांगितले.

यावेळी सचिन शितोळे, हरी माने, नितीन दिवटे, सचिन शिंदे, किरण तारळेकर, संजय तारळेकर, सुभाष भिंगारदेवे, फिरोज तांबोळी, अ‍ॅड. विजय जाधव, राहुल हजारे, अ‍ॅड. धर्मेश पाटील, प्रशांत कांबळे, विनोद पाटील, अ‍ॅड. सचिन जाधव, सचिन मेटकरी, स्मिता सुतार, रेखा पवार, लता मेटकरी, विनायक कचरे, सिध्दार्थ शितोळे, प्रणय भिंगारदेवे आदी उपस्थित होते.

Web Title: Spontaneous response to blood donation camp at Vita