इस्लामपुरात जागतिक दिव्यांग दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:08 IST2020-12-05T05:08:30+5:302020-12-05T05:08:30+5:30
इस्लामपूर : येथील अपंग शिक्षण मंडळ संचलित डॉ. व्ही. एस. नेर्लेकर मूकबधिर विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. ...

इस्लामपुरात जागतिक दिव्यांग दिन उत्साहात
इस्लामपूर : येथील अपंग शिक्षण मंडळ संचलित डॉ. व्ही. एस. नेर्लेकर मूकबधिर विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संचालक रणजित जाधव, नागराज चांदकोटी, प्रा. अशोक शिंदे उपस्थित होते.
अभिमन्यू जाखले यांनी स्वागत केले. अस्मिता शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. विजय पाटील यांनी आभार मानले. संस्थेचे खजिनदार शोभाताई पाटील, अधीक्षक सुरेखा पाटील, मुख्याध्यापिका मनीषा पाटील उपस्थित होत्या.