शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

पंचकल्याणचा निधी शिक्षणावर खर्च करा, प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 19:09 IST

सांगलीत दक्षिण भारत जैन सभेच्या त्रैवार्षिक शंभराव्या अधिवेशनाचे उद्घाटन

सांगली : आण्णासाहेब लठ्ठे यांनी दक्षिण भारत जैन समाजाच्या माध्यमातून शिक्षणाची गंगोत्री ग्रामीण भागापर्यंत पोहोचविल्यामुळेच आज समाजाची प्रगती दिसत आहे. यापुढे समाजाने पंचकल्याण महोत्सवातील शिल्लक निधी शिक्षणावर खर्च करावा, असे आवाहन नांदणी संस्थान मठाचे प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी केले.सांगलीत दक्षिण भारत जैन सभेच्या त्रैवार्षिक शंभराव्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी बोलत होते. दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब (दादा) पाटील अध्यक्षस्थानी होते. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार गीता जैन, माजी आमदार शरद पाटील, जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष दत्ता डोर्ले, माजी महापौर सुरेश पाटील, प्रा. एन. डी. बिरनाळे, सागर वडगावे, हेमंत लठ्ठे, डॉ. भरत लठ्ठे आदी प्रमुख उपस्थित होते.जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी म्हणाले की, यापुढे शैक्षणिक कार्य वाढविण्याची गरज असून, समाजबांधवांनी पंचकल्याण महोत्सवातील शिल्लक निधी शैक्षणिक कार्यासाठी द्यावा. या कार्यासाठी माझे तुम्हाला आशीर्वाद असणार आहेत.माजी आमदार शरद पाटील म्हणाले, जैन समाजातील विषमता दूर झाली पाहिजे. समाजाची सध्या परिस्थिती काय आणि किती समाज आहे हे पाहण्यासाठी जनगणना झाली पाहिजे.डॉ. भरत लठ्ठे म्हणाले, आण्णासाहेब लठ्ठे यांनी तरुण वयात समाजाचे नेतृत्व करून जैन सभा सुरू केली. त्यांचे काम समाजाने उत्तमपणे पुढे नेले आहे.

टॅग्स :Sangliसांगली