स्पेशल रेस्क्यू फोर्स जनतेचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:28 IST2021-02-09T04:28:33+5:302021-02-09T04:28:33+5:30
सांगली : महापुरासह अनेक मोठ्या संकटांमध्ये सर्वसामान्य जनतेला स्पेशल रेस्क्यू फोर्स नेहमीच आधार बनले आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून ...

स्पेशल रेस्क्यू फोर्स जनतेचा आधार
सांगली : महापुरासह अनेक मोठ्या संकटांमध्ये सर्वसामान्य जनतेला स्पेशल रेस्क्यू फोर्स नेहमीच आधार बनले आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांच्या मदतीसाठी ही टीम नेहमीच मदत करताना दिसत आहे, असे प्रतिपादन पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे यांनी केले.
जनसेवा फौंडेशन संचलित स्पेशल रेस्क्यू फोर्सतर्फे कुपवाड येथे कोरोना संकटात सामान्य जनतेला मदत करणाऱ्या आशा वर्कर्स, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरवपत्र देऊन उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे यांच्याहस्ते सत्कार केला, यावेळी ते बोलत होते. यावेळी एस.आर.एफ.चे पथसंचलन, बचाव मदतकार्य प्रात्यक्षिक, रिस्की फायटर्सचे आत्मसंरक्षण प्रात्यक्षिक झाले. गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील विजयी खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी महापालिका महिला व बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे-पाटील, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, सॅलरी सोसायटीचे संचालक शरद पाटील, अरुण बावधनकर, संजय माने, अमित चव्हाण, एस.आर.एफ.चे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, कैलास वडर, महेश गव्हाणे, स्वप्निल धुमाळ, अमोल ढोबळे, संस्थेचे मार्गदर्शक प्रमोद बनसोडे आदी उपस्थित होते.