मिरज पश्चिम भागाचे खास नाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:08 IST2021-01-13T05:08:55+5:302021-01-13T05:08:55+5:30
कसबे डिग्रज : मिरज पश्चिम भागाची नाळ ही सांगलीशी जोडलेली आहे. वसंतदादा आणि दादा घराण्याबरोबर मिरज पश्चिम भाग हा ...

मिरज पश्चिम भागाचे खास नाते
कसबे डिग्रज :
मिरज पश्चिम भागाची नाळ ही सांगलीशी जोडलेली आहे. वसंतदादा आणि दादा घराण्याबरोबर मिरज पश्चिम भाग हा नेहमीच सोबत राहिला आहे. मिरज पश्चिम भागाचा विकास वसंतदादांनीच केला आहे. त्यामुळेच या भागाचे एक खास नातं आहे, असे मत भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक यांनी व्यक्त केले.
कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील वाळवा शिराळा दूध संघाच्या सभासद नोंदणी कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे सभापती जगन्नाथ माळी, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, सागर कोरूचे यावेळी उपस्थित होते.
राहुल महाडिक म्हणाले, वनश्री नानासाहेब महाडिक संस्थेच्या माध्यमातून सामान्य जनतेला अर्थसाह्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर महिला बचत गटांना ही अर्थपुरवठा करून महिलांचे सक्षमीकरण करण्यात येते. महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून युवकांचे मोठ्या प्रमाणात संघटन सुरू आहे. वाळवा शिराळा दूध संघाच्या माध्यमातून प्रत्येक गावांमध्ये दूध डेअरी सुरू केली जाणार आहे. या दूध संघाच्या माध्यमातून मुक्त गोठा संकल्पना तसेच शेतकऱ्यांना जनावरे खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
यावेळी रवींद्र आडमुठे, अजित काशीद, राजेंद्र जाधव, संतोष पिंपळे, सतीश चौगुले, धनाजी जाधव, शिवशांत चव्हाण आदी उपस्थित होते.
फोटो-१०कसबे डिग्रज१
फोटो ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे सभासद नोंदणीवेळी राहुल महाडिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जगन्नाथ माळी, विशाल चौगुले उपस्थित होते.