मानसिक आरोग्य व खेळासाठी विशेष निधी गरजेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:31 IST2021-09-14T04:31:32+5:302021-09-14T04:31:32+5:30
ओळ : बुधगाव (ता. मिरज) येथील परिस फाउंडेशनतर्फे सांगलीवाडी येथील रॉयल कृष्णा बाेट क्लबला आपत्तीमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

मानसिक आरोग्य व खेळासाठी विशेष निधी गरजेचा
ओळ : बुधगाव (ता. मिरज) येथील परिस फाउंडेशनतर्फे सांगलीवाडी येथील रॉयल कृष्णा बाेट क्लबला आपत्तीमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बुधगाव : सदृढ मानसिकतेचेच लोक इतरांसाठी पुढे येतात. हल्ली बहुतांश लोकांना मानसिक आरोग्याच्या सदृढतेसाठी प्रयत्नांची गरज भासू लागली आहे. अशा परिस्थितीत शासनाने त्यासाठी विशेष निधीची तरतूद करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अनिल डुबल यांनी केले.
बुधगाव (ता. पलूस) येथील परिस फाउंडेशन व मिरजेच्या जिव्हाळा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे आपत्तीमित्र व समाजमित्र पुरस्कार, तसेच कोविड योद्ध्यांचा सत्कार डुबल यांच्या हस्ते झाला. महापुरात उल्लेखनीय काम करणाऱ्या सांगलीवाडीच्या तरुण मराठा, राॅयल कृष्णा बोट क्लबला आपत्तीमित्र पुरस्कार देण्यात आला. ५००१ रुपये, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. मिरजेचे सामाजिक कार्यकर्ते सुधीर नाईक यांना ‘२०२१चा समाजमित्र’ पुरस्कार देण्यात आला. कोरोना काळात मानसिक आधार देणाऱ्या पवन गायकवाड, पूनम गायकवाड या दांपत्याला कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
मानसशास्त्रात सुवर्णपदक व पहिल्याच प्रयत्नात पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव नेट-सेट उत्तीर्ण झालेल्या कोल्हापूरच्या साक्षी गावडे यांनाही या वेळी सन्मानित करण्यात आले. परिसचे अध्यक्ष डाॅ. अजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. या वेळी शिवाजी विद्यापीठाचे सिनेट मेंबर श्रीनिवास गायकवाड, सचिन मुळीक (वाळवा), जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब माळी, मिरजेच्या कन्या महाविद्यालयाचे मानसशास्त्र विभागप्रमुख रमेश पट्टीमनी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे समन्वयक राहुल कुंभार, प्रा. प्रसाद जोशी, शैलेश व्यास, अमिष आस्था आदी उपस्थित होते. जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब माळी यांनी आभार मानले.
130921\1838-img-20210913-wa0010.jpg
सांगलीवाडीच्या कृष्णा राॅयल बोट क्लबच्या कार्यकर्त्यांना पुरस्कार प्रदान करताना जिल्हा नियोजन समिती सदस्य अनिल डुबल,शेजारी डाॅ.अजित पाटील, बाबासाहेब माळी आदी