शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली फळ बाजारातील गाळ्यांमध्ये सभापतींनी मारला पाच कोटींचा गाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 16:06 IST

Market Yard Sangli- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विष्णूअण्णा पाटील फळ बाजारात गाळ्यांना परवानगी देऊन सभापतींनी पाच कोटींचा गाळा मारल्याचा आरोप शिवसेना नेते रावसाहेब घेवारे यांनी केला. समितीत त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला असून तो लपविण्यासाठीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आश्रय घेतल्याचे घेवारे म्हणाले. सभापती पाटील यांनी आरोप फेटाळून लावले.

ठळक मुद्देसांगली फळ बाजारातील गाळ्यांमध्ये सभापतींनी मारला पाच कोटींचा गाळा- रावसाहेब घेवारे भ्रष्टाचारावर पांघरुणासाठीच राष्ट्रवादीच्या छताखाली

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विष्णूअण्णा पाटील फळ बाजारात गाळ्यांना परवानगी देऊन सभापतींनी पाच कोटींचा गाळा मारल्याचा आरोप शिवसेना नेते रावसाहेब घेवारे यांनी केला. समितीत त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला असून तो लपविण्यासाठीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आश्रय घेतल्याचे घेवारे म्हणाले. सभापती पाटील यांनी आरोप फेटाळून लावले.घेवारे यांनी पत्रकार बैठकीत आरोप केला की, व्यापारी गाळ्यांसाठी समितीने सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे परवानगी मागितली होती, पण पणन संचालकांनी दिली नाही, तरीही गाळे उभारले जात आहेत. अकरा महिन्यांच्या कराराने व महिन्याला नाममात्र ३०० ते ५०० रुपयांच्या भाड्यावर गाळे दिले आहेत.

प्रत्यक्षात प्रत्येक गाळेधारकाकडून ५ ते ८ लाख रुपये घेतल्याची चर्चा आहे. पावती फक्त ५० हजारांच्या अनामतीची दिली आहे. एकूण व्यवहारात किमान पाच कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. यामध्ये उपनिबंधकांनीही बघ्याची भूमिका घेतली आहे. यावर कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलनासाठी रस्त्यावर येऊ. बैठकीला शिवसेनेचे अनिल शेटे, जितेंद्र शहा, प्रभाकर कुरळपकर हेदेखील उपस्थित होते.महापालिकेने बजावली नोटीसगाळ्यांसंदर्भात महापालिकेने नोव्हेंबरमध्ये समितीला नोटीस बजावली होती. परवानगीशिवाय बेकायदेशीररित्या बांधले जाणारे गाळे ४५ दिवसांत काढून घेण्यास बजावले होते. अन्यथा गाळे पाडण्याचा इशाराही दिला होता. पण नोटीशीनंतर महापालिकेने पुढे कार्यवाही केली नाही.दोन वर्षे लेखा परीक्षणच नाहीघेवारे यांनी समितीच्या लेखा परीक्षणाचा तपशील माहिती अधिकारात मागितला होता, त्यावर २०१८-१९ व २०१९-२० या दोन वर्षांचे लेखा परीक्षण पूर्ण नसल्याने माहिती देऊ शकत नसल्याचा खुलासा विशेष लेखा परीक्षकांनी केला आहे.पैशांसाठी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्नयासंदर्भात सभापती दिनकर पाटील म्हणाले की, लेखापरीक्षणाची जबाबदारी शासनाची आहे. गाळ्यांसाठी पणन संचालकांनी रितसर परवानगी दिली आहे. घेवारे यांचे आरोप फक्त पैशांसाठी असून ब्लॅकमेल करत आहेत. पुरावे असल्यास त्यांनी कायदेशीर मार्गांनी योग्य तेथे दाद मागावी. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डSangliसांगली