जनतेसाठी सभापती, बीडीओंच्या दालनालाही कुलूप ठोकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST2021-06-10T04:19:38+5:302021-06-10T04:19:38+5:30
संतोष आठवले म्हणाले, तासगाव तालुक्यात ग्रामसेवक गावात उपस्थित राहात नाहीत, अशा तक्रारी आहेत. याबाबत प्रशासनाला सांगितले होते. मात्र ...

जनतेसाठी सभापती, बीडीओंच्या दालनालाही कुलूप ठोकू
संतोष आठवले म्हणाले, तासगाव तालुक्यात ग्रामसेवक गावात उपस्थित राहात नाहीत, अशा तक्रारी आहेत. याबाबत प्रशासनाला सांगितले होते. मात्र कवठेएकंद व नागाव कवठेच्या ग्रामसेवक वैद्यकीय रजा टाकून कार्यक्रमांना फिरत आहेत. पर्यायी ग्रामसेवक वेळेत दिला जात नाही. रजा देण्याचे काम नियमाने बीडीओ करत नाहीत.
चुकीच्या ग्रामसेवक व अधिकाऱ्यांना बीडीओ पाठीशी घालत तालुक्याचे नुकसान करत आहेत. तालुक्यात २८ गावात बिहार पॅटर्न योजना राबविण्यात आली. मात्र २३ गावात ती फेल आहे. शासनाचा पैसा चुकीच्या पद्धतीने उधळला असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. मासिक बैठक ऑनलाइन घेताना त्या ३२ ग्रामसेवकांना गोळा करून शासकीय आदेशाचा भंग करत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशासनाच्या दबावाला आपण घाबरत नाही. वेळ पडली तर जनतेसाठी सभापती व बीडीओ यांच्या दालनालाही कुलूप ठोकण्याचा इशारा संतोष आठवले यांनी दिला.
चौकट:
प्रशासनाने उत्तरे द्यावीत
पंचायत समिती सदस्यानी व्यक्तिगत कामासाठी नाही तर लोकभावना म्हणून कुलूप घातले. पण शेतकऱ्यांना गोठा बांधणीसाठी ७० हजार असताना ३५ हजारच का मिळतात. विहिरीतील गाळ काढण्याची कामे बंद का केली. यांसह तालुक्याच्या लोकांच्या अन्य काही प्रश्नांची उत्तरे बीडीओ व प्रशासनाने द्यावीत, असे आव्हान सदस्य सुनील जाधव यांनी दिले.