शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सांगलीतील प्राणीमित्रांनी मुक्त केले चिमणीच्या पिलांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 17:18 IST

माणसाचा सहजिवी म्हणून चिमण्यांची ओळख असली तरी तिच्या घटत्या संख्येची चिंता व्यक्त होत आहे. तिच्या संवर्धनाच्या मोहिमा आखल्या जात असताना प्राणीमित्रांनी तिच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी एक छत्री उभी केली आहे. याच चळवळीत रमलेल्या अ‍ॅनिमल फाऊंडेशनच्या पथकाने मंगळवारी पाय चिकटलेल्या दोन चिमण्यांची मुक्तता करीत त्यांचे विहाराचे स्वप्न साकार केले.

ठळक मुद्देसांगलीतील प्राणीमित्रांनी मुक्त केले चिमणीच्या पिलांनाएकमेकांना चिकटलेले दोन्ही पाय केले स्वतंत्र

सांगली : माणसाचा सहजिवी म्हणून चिमण्यांची ओळख असली तरी तिच्या घटत्या संख्येची चिंता व्यक्त होत आहे. तिच्या संवर्धनाच्या मोहिमा आखल्या जात असताना प्राणीमित्रांनी तिच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी एक छत्री उभी केली आहे. याच चळवळीत रमलेल्या अ‍ॅनिमल फाऊंडेशनच्या पथकाने मंगळवारी पाय चिकटलेल्या दोन चिमण्यांची मुक्तता करीत त्यांचे विहाराचे स्वप्न साकार केले.शिवोदयनगरमधील एका घराबाहेर बंद स्थितीत असलेल्या दुचाकीच्या हेडलाईट कव्हरच्या मोकळ््या जागेत चीरक (इंडियन रॉबिन) या चिमणीने घरटे बांधले. विणीचा हंगाम सुरू असल्याने लगबगीने हे घरटे तयार केले. तिला दोन पिली झाली. चोचीत अन्न, पाणी आणून ती पिलांना भरवायलाही लागली. पिली उडण्याच्या अवस्थेला आल्यानंतर किलबिलाट सुरू झाला. पिली उडायचा प्रयत्न करायची आणि खाली कोसळायची.

पुन्हा त्यांना त्यांच्या घरट्यात सोडले की पुन्हा तोच प्रकार व्हायचा. त्या दोन्ही पिलांचा एक पाय एकमेकांना जन्मजात चिकटला होता. पिले खाली पडली की कुत्री, मांजरी त्यांच्यावर ताव मारण्यासाठी टपून बसलेली असायची, त्यामुळे पिलांच्या आईचा जीव टांगणीला लागला होता.

संबंधित कुटुंबियांनी अनिमल फाऊंडेशनचे मुस्तफा मुजावर यांच्या संपर्क साधला. मुजावर यांच्यासह मंदार शिंपी व जावेद शेख या प्राणीमित्रांनी तातडीने धाव घेतली. घरट्यातून पिलांना बाहेर काढले आणि पाहणी केली. दोन्ही पिलांचे पाय चिकटले होते. त्यातच एक दोराही अडकल्याने एका पिलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.

प्राणीमित्रांनी अत्यंत कष्टाने व अलगदपणे दोन्ही पिलांना स्वतंत्र केले. एका चिमणीच्या पायाला कापड बांधून दोघांनाही घरट्यात पूर्ववत ठेवण्यात आले. दोन्ही पिलांना जिवदान मिळाले. आकाशात विहाराचे पिलांचे व तिच्या आईचे स्वप्न साकार करण्यासाठी प्राणीमित्रांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक येथील नागरिकांतून होत आहे.

घरट्यात पुन्हा किलबिलप्राणीमित्रांकडून पिलांवर उपचार सुरू असताना तिच्या आईच्या जिवाची घालमेल सुरू होती. तिचा आरडाओरडला सुरू होता. पिली सुखरुपपणे व स्वतंत्र होऊन घरट्यात परतल्यानंतर लगेचच तिच्या आईने चोचीतून अन्न आणून त्यांना भरविले. बराच वेळ शांत असलेल्या घरट्यात पुन्हा किलबिलाट सुरू झाला.काय आहे पक्ष्याचे वैशिष्ट्यहा एक पक्षी झुडपी रानात, तसंच शहरात आणि खेडेगावांमध्येही दिसतो. या पक्ष्याचा मुख्य आहार म्हणजे किडे, कोळी इ. या पक्ष्यांची शेपटी उभारलेली असते आणि पंख शेपटीच्या बाजूंवर पाडलेले असतात. नर काळा कुळकुळीत तर मादी तपकिरी रंगाची असते. 

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यSangliसांगली