लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : शिराळा विधानसभा मतदारसंघातील वारकरी यांच्यासाठी सर्वसोयींनीयुक्त सांगली जिल्ह्यामध्ये पहिले शिराळा येथे प्रशस्त वारकरी भवन उभारणार असल्याची घोषणा आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली.
शिवरवाडी (ता. शिराळा) येथे अखिल भारतीय वारकरी संघटनेतर्फे वारकरी संप्रदायच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून आ. मानसिंगराव नाईक बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष एम. जी. पाटील होते. यावेळी मठाधिपती डॉ. निलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, कलाकार मानधन समितीचे उपाध्यक्ष अविनाश कुदळे, अखिल भारतीय वारकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ह. भ. प. नंदू महाराज, ह.भ.प. गजानन पाटील, गोपाळकृष्ण वारकरी संस्थेचे अध्यक्ष अनिल देवळेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
आ. नाईक म्हणाले की, शिराळा तालुक्यातील युवा पिढीला वारकरी संप्रदाय हा प्रेरणादायी ठरेल. वारकरी यांचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला जाईल. यापुढील काळात सुसंस्कारित समाज घडविण्याचे काम वारकरी मंडळी यांनी करावे.
अनंत सपकाळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा अध्यक्ष एम .जी. पाटील, उपाध्यक्ष अविशान कुदळे, नंदू महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सरपंच लक्ष्मी देसाई, जिल्हा उपाध्यक्ष जयवंत चौगुले, बाजार समिती संचालक आण्णा बेंदरे, शिराळा मतदारसंघातील वारकरी पुरुष-महिला आदी उपस्थित होते.