सोयाबीनला ४५०० रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:27 IST2021-01-03T04:27:47+5:302021-01-03T04:27:47+5:30
उडीदला ६५०० रुपये दर सांगली : येथील मार्केट यार्डात शनिवारी निघालेल्या उडीदाच्या सौद्यात प्रतिक्विंटल सहा हजार ते सहा हजार ...

सोयाबीनला ४५०० रुपये दर
उडीदला ६५०० रुपये दर
सांगली : येथील मार्केट यार्डात शनिवारी निघालेल्या उडीदाच्या सौद्यात प्रतिक्विंटल सहा हजार ते सहा हजार ५०० रुपये दर मिळाला. सरासरी क्विंटलला सहा हजार २५० रुपये दर मिळाला आहे. एक हजार ७४४ पोती उडदाची आवक झाल्याचे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
गुळाला ४०११ रुपये दर
सांगली : कोल्हापुरी गुळाला प्रतिक्विंटल दोन हजार ५०० ते तीन हजार ७९० रुपये दर मिळाला आहे. सरासरी तीन हजार १४५ रुपये दर मिळाल्यामुळे शेतकरी आणि गूळ उत्पादक चिंतेत सापडला आहे. गुळाचे दर कधी वाढणार असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. शनिवारी एक हजार ६५७ क्विंटल, तर एप्रिल ते आजअखेरपर्यंत तीन लाख ८९ हजार ८२० क्विंटल गुळाची आवक झाली होती.