तांदुळवाडी परिसरात सोयाबीन, भुईमूग, भात पिकांची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST2021-06-11T04:18:15+5:302021-06-11T04:18:15+5:30

तांदूळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन, भुईमूग टोकन व भात या पिकांच्या पंचवीस टक्के पेरण्या पूर्ण झाल्या ...

Sowing of soybean, groundnut, paddy crops in Tandulwadi area | तांदुळवाडी परिसरात सोयाबीन, भुईमूग, भात पिकांची पेरणी

तांदुळवाडी परिसरात सोयाबीन, भुईमूग, भात पिकांची पेरणी

तांदूळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन, भुईमूग टोकन व भात या पिकांच्या पंचवीस टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित पेरण्या पावसानंतर होण्याची शक्यता आहे.

तांदूळवाडी परिसरात कुंडलवाडी, मालेवाडी, बहादूरवाडी, कोरेगाव, भडकंबे, नागाव, कणेगाव, भरतवाडी, आदी गावे येत असून, या गाव परिसरात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर जून महिन्याच्या सुरूवातीला वळीव पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी शेतात पाणी साचले होते, याचा विचार करून शेतकऱ्यांनी भात पेरणीला व सोयाबीन, भुईमूग टोकणीनीस सुरुवात केली होती. हा वळीव स्वरूपात पडलेला पाऊस हा दोन-तीन दिवसांनी वारंवार पडत राहील, अशी आशा होती पण पावसाने तोंड फिरवले. त्यामुळे उर्वरित पेरण्या पूर्णपणे थांबल्या आहेत तर सद्यस्थितीत पंचवीस टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आता उर्वरित पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Sowing of soybean, groundnut, paddy crops in Tandulwadi area