शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

सांगली जिल्ह्यात २.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, सर्वात कमी कोणत्या तालुक्यात..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 18:04 IST

सोयाबीन पेरणी २५ टक्क्यांनी घटली 

सांगली : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात एकूण दोन लाख ४६ हजार ११८.७१ हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून, सध्या दोन लाख २५ हजार ८१८.२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. म्हणजेच ९१.७५ टक्के क्षेत्रावर पेरणीचे काम पूर्ण झाले आहे. सोयाबीनला दराची हमी नसल्यामुळे २५ टक्क्यांनी पेरणीचे क्षेत्र घटले आहे.जिल्ह्यात यंदा मे आणि जून महिन्यात सतत पावसामुळे पेरण्या विलंबाने सुरू झाल्या. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांच्या पेरण्या उरकल्या आहेत. खरिपाचे सरासरी क्षेत्र दोन लाख ४६ हजार ११८ हेक्टर इतके असून, दोन लाख २५ हजार ८१८.२५ हेक्टरवर म्हणजे ९.५५ टक्के पेरणी झाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ७० टक्के पेरणी झाली होती. महिन्यात २१.७५ टक्क्यांनी पेरणी वाढली आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात मात्र घट दिसून येत आहे.गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या फक्त ३१ हजार ८३५.५० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. ही पेरणी फक्त ७५.९६ टक्के भागात झाली आहे. सोयाबीन क्षेत्रातील घट प्रशासनासाठी आव्हान ठरू शकते. जत तालुक्यात सर्वाधिक १०६.२८ टक्के तर सर्वात कमी शिराळा तालुक्यात ५४.१३ टक्के पेरणी झाली आहे. आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यांत १०४.७७ टक्के तर पलूस, मिरज तालुक्यांत ९५ टक्केपर्यंत पेरणी झाली आहे.

उडीद, सोयाबीनला किडींचा प्रादुर्भावबदलते वातावरण आणि रिमझिम पावसामुळे मका, मूग, उडीद, सोयाबीन पिकांवर काही प्रमाणात रोग, किडींचा प्रादुर्भाव झाला असल्याचे कृषी विभागाने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. शेतकऱ्यांनी रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी शिफारस केलेल्या औषधांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्राची टक्केवारीतालुका - टक्केवारीमिरज - ९५.०३जत - १०६.२८खानापूर - ९०.०९वाळवा - ६४.०९तासगाव - ९७.४१शिराळा - ५४.१३आटपाडी - १०४.७७क.महांकाळ - १०४.७७पलूस - ९६.५०कडेगाव - ८४.३७

पीकनिहाय पेरणी क्षेत्रपीक - क्षेत्र हेक्टर - टक्केवारीभात - ८४७८ - ६३.०७खरीप ज्वारी - १७०५१ - ६५.६६बाजरी - ४४४९८ - ८८.५२नाचणी - ३७ - २९मका - ४९६७८.५० - ११६.९३इतर तृणधान्य - १५०१.५० - ६७.३३तूर - ११७६३.३० - १२१.७२मूग - ४७८७.५० - ९२.२५उडीद - १९९२५.२० - १३३.१४भुईमूग - २९६२८.३५ - ९२.९६सूर्यफूल - ५१५ - ५२.०९सोयाबीन - ३१८३५.५० - ७५.९६