सांगली : दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मंगळवारी (दि. २४) मुंबईत ते सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत.रावसाहेब पाटील यांनी दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. जैन सभेच्या माध्यमातून जैन समाजामध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो. मंगळवारी (दि. २४) भाजपच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, प्रदेश उपाध्यक्ष संदीप भंडारी, भाजप जैन प्रकोष्ट पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख प्रशांत गोंडाजे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील करणार भाजपमध्ये प्रवेश, आज मुंबईत कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:37 IST