दिलासादायक : कोरोनाबाधितांमध्ये घट; १७२० नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:28 IST2021-05-09T04:28:01+5:302021-05-09T04:28:01+5:30
सांगली : कोरोनाबाधितांची विक्रमी संख्येकडे सुरू असलेली चिंताजनक वाटचालीस शनिवारी ब्रेक लागला. बाधितांची संख्या घटली असलीतरी वाढती मृत्युसंख्या मात्र ...

दिलासादायक : कोरोनाबाधितांमध्ये घट; १७२० नवे रुग्ण
सांगली : कोरोनाबाधितांची विक्रमी संख्येकडे सुरू असलेली चिंताजनक वाटचालीस शनिवारी ब्रेक लागला. बाधितांची संख्या घटली असलीतरी वाढती मृत्युसंख्या मात्र कायम आहे. दिवसभरात १७२० जणांना कोरोनाचे निदान होताना परजिल्ह्यातील नऊ आणि जिल्ह्यातील ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. १३८० जणांनी कोरोनावर मात केली आहे. वाळवा तालुक्यात सर्वाधिक ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून दोन हजारावर रुग्णांची नोंद होत होती. शनिवारी त्यात चांगली घट होत १७२० नवे बाधित आढळले आहेत. ४६ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात वाळवा तालुक्यातील ११ जणांचा समावेश आहे.
गेल्या तीन दिवसांपासून दोन हजारावर रुग्णांची नोंद होत होती. शनिवारी त्यात चांगली घट होत १७२० नवे बाधित आढळले आहेत. ४६ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात सांगली ५, मिरज ३, वाळवा तालुक्यातील ११, जत ७, मिरज तालुक्यात ५, कवठेमहांकाळ ४, पलूस, तासगाव प्रत्येकी ३, खानापूर, शिराळा प्रत्येकी दोन आणि आटपाडी तालुक्यातील एकाचा समावेश आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने आरटीपीसीआर अंतर्गत २१५० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ७२९, तर रॅपिड अँटिजनच्या ४०६१ तपासणीतून १०७१ जण बाधित आढळले आहेत.
उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १७ हजारांवर पोहोचली असून, १७ हजार २८ रुग्णांपैकी २६४१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. चिंताजनक रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. यातील २४०४ जण ऑक्सिजनवर तर २३७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
परजिल्ह्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला असून, नवीन ८० जण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील ४० जणांचा समावेश आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ८९,४१३
उपचार घेत असलेले १७,०२८
कोरोनामुक्त झालेले ६९,७८३
आतापर्यंतचे एकूण मृत्यू २६०२
शनिवारी दिवसभरात
सांगली १०५
मिरज ८१
जत २९५
मिरज तालुका २३२
वाळवा १८४
खानापूर १६२
तासगाव १५९
आटपाडी, कवठेमहांकाळ प्रत्येकी ११४
कडेगाव १०४
पलूस १०३
शिराळा ६७