शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजासाठी लवकरच वसतिगृह - सुधीर गाडगीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:30 IST

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केले जाईल. तसेच धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी लवकरच वसतिगृह उभारण्यात येईल, अशी घोषणा भाजपचे आ. सुधीर गाडगीळ यांनी

ठळक मुद्दे सांगलीत सर्वपक्षीय नगरसेवकांचा सत्कार, अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करण्याची ग्वाही

सांगली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केले जाईल. तसेच धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी लवकरच वसतिगृह उभारण्यात येईल, अशी घोषणा भाजपचे आ. सुधीर गाडगीळ यांनी केली.

सांगली महापालिका निवडणुकीत धनगर समाजाचे सर्व पक्षाचे मिळून बारा नगरसेवक निवडून आले आहेत. समस्त धनगर समाजाच्यावतीने शनिवारी नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. आमदार गाडगीळ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी स्वागताध्यक्ष तात्यासाहेब गडदे, महापौर संगीता खोत, भाजपचे नेते शेखर इनामदार, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर ,विठ्ठल खोत यांच्यासह धनगर समाजाचे नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.

गाडगीळ म्हणाले, महापालिकेच्या निवडणुका आता पार पडल्या आहेत. आता सर्व समाजाचे प्रतिनिधीत्व तुम्ही करीत आहात. आपण प्रभागाचे नगरसेवक आहोत, हे लक्षात ठेवून विकास कामे करायला हवीत. सांगलीच गतवैभव परत मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करायला हवे. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे रखडलेले काम निश्चित पूर्ण करु. मंत्री राम शिंदे यांनी ओबीसी समाजाचे पहिले वसतिगृह सांगलीला देऊ, अशी घोषणा केली होती. आता सर्व धनगर समाजाच्या नगरसेवकांनी आणि आम्ही मिळून हे वसतिगृह निर्माण करुन देऊ.

महापौर संगीता खोत म्हणाल्या, मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री, आमदार गाडगीळ, आमदार खाडे यांनी या शहराचा पहिल्या महापौर पदाचा मान माझ्यासारख्या धनगर समाजातील स्त्री उमेदवाराला दिला. विकासकामाला निधी कमी पडणार नाही. महापौर म्हणून मी स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन पारदर्शी कारभार करू, अशी ग्वाही दिली.

शेखर इनामदार म्हणाले, भाजपला एकेकाळी ठराविक जातीचा पक्ष म्हणून हिणवले जात होते, आज खऱ्याअर्थाने धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून भाजप पुढे येत आहे. धनगर समाजाला भाजप सरकारच आरक्षण देणार आहे. शहराच्या विकासाकरिताही भाजप कटिबद्ध असून, सुसह्य जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टी शहरात होतील.

यावेळी प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, नगरसेवक विष्णू माने, प्रकाश ढंग, गजानन आलदर, कल्पना कोळेकर, सविता मदने आदींची भाषणे झाली. स्वागत-प्रास्ताविक तात्यासाहेब गडदे यांनी केले. आभार बाळासाहेब फोंडे यांनी मानले. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले.मते न देणाºयांवर अन्याय नको!गाडगीळ म्हणाले, महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर एखाद्या भागातून मतदान मिळाले नाही म्हणून त्या भागात काम करायचे नाही, असे कोणीही करू नये. माणसांची मते कामाने बदलतात. काम करणारा माणूस समाज बघतो. मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर कुणी काम घेऊन आला तर कुणालाही नाही म्हटले नाही.सांगलीत शनिवारी धनगर समाजाच्या नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी डावीकडून (पहिली रांग) विठ्ठल खोत, शेखर इनामदार, अण्णासाहेब गडदे, आ. सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीreservationआरक्षण