शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
2
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
3
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
4
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
5
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
6
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
7
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
8
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
9
‘आमच्यावर बॉम्ब फेकले तर अमेरिकेचे..., तणाव वाढत असताना इराणची थेट धमकी   
10
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
11
भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर…’, काँग्रेसची बोचरी टीका
12
PM Modi: भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
13
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
14
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
15
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
16
इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर
17
‘जैशकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर…’, नव्या ऑडियोमधून मसूद अझहरची धमकी
18
कुत्र्याची भन्नाट हुशारी! तगड्या पिटबूलची 'अशी' केली फजिती; Video पाहून नेटकरीही थक्क
19
ट्रम्प यांच्या अमेरिकेत एक नवीन दहशत, गुलाबी कोकेन; सेवन केल्यावर शरीर निळे पडते
20
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका पटावर नवी सोंगटी, बाप माणसांची राजकीय कसोटी; सांगलीत 'या' नेत्यांची मुले, पुतणे, सुना निवडणूक रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 17:02 IST

प्रचारात दिले झोकून : मुलांच्या भवितव्यासाठी संघर्ष

सांगली : महापालिकेच्या निवडणुकीत यंदा राजकारणातील वारसदारांची मोठी उतरंड पाहायला मिळत आहे. शहरातील विविध प्रभागांत दिग्गज नेत्यांची मुले, पुतणे, सुना थेट निवडणूक रिंगणात उतरली असून, त्यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी ‘बापमाणसांनी’ स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. भावी पिढीच्या राजकीय वाटचालीसाठी हे ज्येष्ठ नेते दिवसाची रात्र करत प्रचारात झोकून देताना दिसत आहेत.कुठे पदयात्रा, कुठे बैठका, तर कुठे थेट मतदारांच्या दारात जाऊन गाठीभेटी घेतल्या जात आहेत. पक्षाची यंत्रणा, कार्यकर्ते आणि समर्थकांना सोबत घेऊन ज्येष्ठ नेते स्वतः मैदानात उतरल्याने निवडणूक प्रचाराला वेगळेच धारदार स्वरूप आले आहे. काही प्रभागांत तर ‘उमेदवार नव्हे, बापमाणूसच लढतोय’ अशी चर्चा रंगू लागली आहे.महापालिकेची ही सहावी निवडणूक आहे. या काळात अनेकांनी महापालिकेच्या राजकारणात दुसरी पिढीला समोर आणले आहे. काही नेत्यांनी मुलगा, मुलगी यांना संधी दिली आहे, तर काहींनी पुतण्यावर भरवसा ठेवत राजकीय वारसांची धुरा दिली आहे. यंदाच्या निवडणुकीतही डझनभर बापमाणूस भावी पिढीच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. राजकारणातील अनुभव, संपर्क आणि प्रभाव याचा पुरेपूर वापर करून पुढील पिढीला स्थिरावण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, यामुळे घराणेशाहीचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नवख्या पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी ही स्पर्धा अधिक कठीण बनल्याची चर्चा शहरात सुरू आहे. महापालिकेच्या या निवडणुकीत बापमाणसांच्या ताकदीवर कोणाची राजकीय वारसदारी सिद्ध होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विजयासाठी दिवसरात्र परिश्रम१. खासदार विशाल पाटील यांनी पुतण्या हर्षवर्धन याला उमेदवारी दिली आहे. त्याच्यासाठी खा. पाटील यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.२. स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश आवटी यांचे दोन्ही चिरंजीव संदीप व निरंजन पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. गतवेळी दोन्ही चिरंजीव विजयी झाले. यंदाही त्यांच्यासाठी आवटी प्रयत्न करताना दिसत आहेत.३. माजी महापौर किशोर जामदार यांनी मुलगा करण याला गत निवडणुकीत महापालिकेच्या मैदानात उतरविले होते. यंदाही करण जामदार निवडणूक लढवीत आहे. त्याच्यासाठी किशोर जामदार मोर्चेबांधणी करीत आहेत.४. स्थायी समितीचे माजी सभापती दिलीप सूर्यवंशी यांचे दोन्ही पुतणे धीरज व चेतन हे वेगवेगळ्या प्रभागातून लढत आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी दिलीप सूर्यवंशी यांनी फिल्डिंग लावली आहे.

प्रचारासाठी झटणारे ज्येष्ठ

  • विशाल पाटील : पुतण्या
  • इद्रीस नायकवडी : मुलगा
  • दिनकर पाटील : सून
  • किशोर जामदार : मुलगा
  • संगीता खोत : पुतण्या
  • सुरेश आवटी : दोन मुले
  • दिलीप सूर्यवंशी : दोन पुतणे
  • बटूदादा बावडेकर : मुलगा
  • धनपाल खोत : सून
  • किरण सूर्यवंशी : सून
  • मोहन व्हनखंडे : मुलगा
  • सचिन कदम : सून
  • हारुण खतीब : मुलगा
  • रज्जाक नाईक : बहीण
English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Elections: Political Heirs and their Influential Fathers in the Ring

Web Summary : Sangli's municipal election sees leaders' children, nephews, daughters-in-law contesting, backed by their influential fathers. These senior leaders campaign intensely, aiming to secure their family's political future, raising questions about dynastic politics.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Politicsराजकारण