सोनीत दोन गटात हाणामारी, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:21 IST2021-06-04T04:21:27+5:302021-06-04T04:21:27+5:30

मिरज : सोनी ( ता. मिरज ) येथे एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत दोघे जखमी झाले ...

Sonit fights in two groups, both injured | सोनीत दोन गटात हाणामारी, दोघे जखमी

सोनीत दोन गटात हाणामारी, दोघे जखमी

मिरज : सोनी ( ता. मिरज ) येथे एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली असून, सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भाऊसाहेब आनंदा चौगुले यांनी विनायक नंदकुमार तेली (कांबळे), सोमनाथ नंदकुमार तेली (कांबळे), नितीन नंदकुमार तेली (कांबळे) आणि गणेश वैभव तेली (कांबळे) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. याचवेळी विनायक नंदकुमार तेली (कांबळे) यांनी भाऊसाहेब आनंदा चौगुले व रामेश्वर आनंदा चौगुले यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. भाऊसाहेब चौगुले व त्यांची पत्नी घरासमोर बसले असताना घरासमोरुन जाणाऱ्या विनायक याने ‘माझ्याकडे रागाने का बघतोस, तुला मस्ती आली आहे’, असे म्हणत शिवीगाळ केली. अन्य दोघांन‍ा बोलावून फरशीने डोक्यात मारुन व कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण करुन जखमी केल्याची तक्रार चौगुले यांनी दिली आहे. तेली यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भाऊसाहेब याच्या घरासमोरुन जात असताना, त्याने विनायक तेली (कांबळे) याला ‘तू चोर आहेस’ असे म्हणत शिवीगाळ केली. यावेळी तेली याने ‘तू आमच्या घरातील व्यक्तींकडे वाईट नजरेने बघतोस आणि आम्हालाच चोर म्हणतोस’ असे म्हटल्याने भाऊसाहेब व रामेश्वर चाैगुले हे दोघे मारण्यासाठी धावून आले. यावेळी त्यांच्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याचे विनायक तेली याने तक्रारीत म्हटले आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Sonit fights in two groups, both injured